Ramesh Babu Death : महेश बाबूंचे मोठे भाऊ रमेश बाबू यांचे निधन; दुपारी 1 वाजता होणार अंत्यसंस्कार

author img

By

Published : Jan 9, 2022, 12:52 PM IST

Updated : Jan 9, 2022, 1:16 PM IST

Ramesh Babu

रमेश बाबू यांच्या पार्थिवावर ज्युबिली हिल्स महाप्रस्थान ( Jubilee Hills Mahaprasthana ) येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव श्रद्धांजलीसाठी पद्मालय स्टुडिओत नेण्यात येईल. त्यांनी अल्लुरी सीतारामराजू (1974) ( Alluri Sitaramaraju ) द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

हैदराबाद - तेलगू सुपरस्टार महेश बाबू यांचे भाऊ घटामनेनी रमेश बाबू (५६) यांचे (Mahesh Babu's brother Ramesh Babu passed away) शनिवारी ८ जानेवारी रोजी निधन झाले.

रमेश बाबू यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त (Liver related disease) होते. रमेश बाबू शनिवारी संध्याकाळी गंभीर आजारी पडले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने गच्चीबाऊली येथील एआयजी रुग्णालयात (AIG hospital in Gachibowli) नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ज्युबिली हिल्स येथे होणार अंत्यसंस्कार

रमेश बाबू यांच्या पार्थिवावर ज्युबिली हिल्स महाप्रस्थान ( Jubilee Hills Mahaprasthana ) येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव श्रद्धांजलीसाठी पद्मालय स्टुडिओत नेण्यात येईल.

घटामनेनी कुटुंबीयांनी चाहत्यांना COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अंत्यसंस्काराच्या वेळी एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे.

Ramesh Babu
कोरोना नियम पाळण्याचे आवाहन

अल्लुरी सीतारामराजू चित्रपटातून केले पदार्पण

रमेश बाबूने अल्लुरी सीतारामराजू (1974) ( Alluri Sitaramaraju ) द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 1997 पासून अभिनयापासून दूर असलेल्या रमेश बाबूने 'अर्जुन', 'अथिधी', 'डूकुडू', 'आगाडू' यांसारखे चित्रपट निर्मिती केली. दरम्यान, महेश बाबू होम आयसोलेशनमध्ये आहेत कारण त्यांना कोरोनाची लागण झाले आहेत.

हेही वाचा - यश वाढदिवसासाठी का 'उत्साही' नसतो?, पाहा त्याचा खुलासा

Last Updated :Jan 9, 2022, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.