ETV Bharat / sitara

Special interview with Gangubai Family : 'गंगु माँ'ची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न होतोय - कुटुंबीयांचा आरोप

author img

By

Published : Feb 22, 2022, 7:57 PM IST

Updated : Feb 22, 2022, 10:28 PM IST

ETV Bharat Special Interview with Gangubai Family
ETV Bharat Special Interview with Gangubai Family

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ( Director Sanjay Leela Bhansali ) यांचा बहुचर्चित वादग्रस्त चित्रपट गंगुबाई काठीयावाडी 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ( Gangubai Kathiyawadi Releasing on 25 February ) या चित्रपटावर गंगुबाई यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांनी गंगुबाई यांची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ( Director Sanjay Leela Bhansali ) यांचा बहुचर्चित वादग्रस्त चित्रपट गंगुबाई काठीयावाडी 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ( Gangubai Kathiyawadi Releasing on 24 February ) या चित्रपटावर गंगुबाई यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांनी गंगुबाई यांची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ( ETV Bharat Special interview with Gangubai Family ) ईटीव्ही भारतने त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने गंगूबाई यांच्या परिवाराशी साधलेला संवाद

कुणी केली 'गंगु माँ'ची गंगुबाई -

गंगु माँ यांची मुलगी बबिता गौडा यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले की, "माझी आई कधीच शिव्या द्यायची नाही. सर्व तिला गंगू माँ म्हणायचे आणि अजूनही बोलतात. मात्र, चित्रपटात तिला माफिया क्वीन, धंदेवली बाई, पान खाणारी शिवराळ बाई, असं दाखवण्यात आलंय. हे सर्व चुकीचं आहे. माझी आई अशी कधीच नव्हती. हा माझ्या आईची ओळख पुसण्याचा प्रयत्न आहे."

पैशासाठी आजीची बदनामी -

गंगुबाई यांचा नातू विकास गोवडा यांनी सांगितले की, "दिग्दर्शक संजय लीला भन्साळी स्वतः आईचं नाव लावतात. मात्र, चित्रपटातून कमाई करण्यासाठी हे लोक दुसऱ्याच्या आईची बदनामी करत आहेत."

हेही वाचा - नेमक्या कशा होत्या गंगू माँ -

बबिता गौडा यांनी सांगितले की, "माझ्या आईने कुणाला धंद्याल्या लावलं नाही. उलट ज्या बायकांना धंद्यातून बाहेर पडायचं होतं त्यांना तिने मदत केली. अनेक बायकांची लग्न लावून दिली आहेत. ती नऊवारी साडी नेसायची. तिच्या ब्लाउजला सोन्याची चैन आणि सोन्याची बटणं होती. आईला सोन्याची आवड होती", असेही बबिता यांनी सांगितले.

काठियावाडी ते कामाठीपुरा -

गंगुबाई यांच्या घरची परिस्थिती सधन होती. त्यांना अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून त्या मुंबईत आल्या. मात्र, मुंबई आल्यावर त्यांच्या मॅनेजरने त्यांना कामाठीपुरात विकलं. आणि इथूनच त्यांनी लढायला सुरुवात केली. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गंगुबाई यांचे संबंध असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चाही खोट्या असल्याचे गंगुबाई यांचे नातेवाईक म्हणाले.

पंडित नेहरू आणि गंगूबाईंचे संबंधांबद्दल वस्तुस्थिती काय?

दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गंगुबाई यांच्या संबंधाबद्दल बोलताना विकास गौडांनी सांगितले की, "त्यावेळी कामाठीपुरा परिसरातील वेश्या व्यवसाय हटवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महिलांची बाजू मांडण्यासाठी आजी दिल्लीला पंतप्रधान नेहरूंना भेटण्यासाठी गेली होती. दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि नेहरू वारंवार व्यवसाय हटवण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करू, असं सांगत होते. त्यावेळी आजींनी त्यांना प्रश्न केला की, तुम्ही एक काम करा. तुम्ही माझ्यासोबत लग्न करा आणि इतर महिलांशीही करा. तयार आहात? या प्रश्नानंतर नेहरू भडकले. तेव्हा आजी म्हणाली तुम्ही पंतप्रधान असून हे करू शकत नाही तर इतर लोकं कसं स्वीकारणार या महिलांना? अशी ती घटना आहे."

Last Updated :Feb 22, 2022, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.