ETV Bharat / sitara

निरागस चेहरा आणि हॉट बॉडी या कॉम्बिनेशनची हिरॉईन दिशा पाटनीची तरुणाईत आहे प्रचंड क्रेझ!

author img

By

Published : May 21, 2021, 6:56 PM IST

‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा दिग्दर्शक प्रभुदेवाने दिशा पाटनीचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘दिशा खूप मेहनती मुलगी आहे. सुंदर निरागस चेहरा आणि हॉट बॉडी हे कॉम्बिनेशन क्वचितच सापडते जे दिशाकडे आहे. ती दिसायला सुंदर तर आहेच परंतु तिचा फिटनेस पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल, असे त्याने म्हटलंय.

Disha Patni has a huge craze in her youth
‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’

प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेला ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ने रिलीज झाल्याझाल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रेकॉर्ड ब्रेक केले. पहिल्या दिवशी तर लाखो लोकांनी चित्रपट बघण्यासाठी केलेल्या डिजिटल घाईगर्दीत झीप्लेक्स प्लॅटफॉर्म काही वेळासाठी क्रॅश झाले होते. प्रभुदेवा आणि सलमान खान मध्ये एक खास नाते आहे कारण त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘वॉन्टेड’ च्या यशानंतर सलमान खानचे करियर पुन्हा एकदा रुळावर आले आणि त्यानंतर सलमानने मागे वळूनही पाहिले नाही. प्रभुदेवा ची ‘राधे’ मधील हिरॉईन दिशा पाटनी बद्दलचे त्याला आस्था आहे. ‘दिशा खूप मेहनती मुलगी आहे. सुंदर निरागस चेहरा आणि हॉट बॉडी हे कॉम्बिनेशन क्वचितच सापडते जे दिशाकडे आहे. ती दिसायला सुंदर तर आहेच परंतु तिचा फिटनेस पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल. आणि म्हणूनच दिशा तरुणाईची लाडकी अभिनेत्री असून तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ आहे. ‘राधे’ मधील भूमिकेने तिने थेट प्रेक्षकांच्या हृदयात उडी घेतली आहे. या सुंदर अभिनेत्रीने चित्रपटात एक स्तुत्य काम केले आहे आणि तिने आपल्यासोबत आणलेल्या ग्लॅमरबद्दल तिचे कौतुकही होत आहे’, असे प्रभुदेवाचे मत आहे.

Disha Patni has a huge craze in her youth
‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’

दिग्दर्शक प्रभुदेवाने दिशाचे तोंडभरून कौतुक केले आहे. एका अग्रगण्य नियतकालिकेच्या मुलाखतीत त्यांनी शेअर केले की, “ती एक अत्यंत परिश्रम करणारी अभिनेत्री आहे. एक प्रकारे दिशा-सलमान ही बॉलिवूडमधील एक नवीन जोडी आहे. त्यांनी चित्रपटासाठी मेहनत घेत उत्तम काम केले असून आणि गाण्यांमध्येही त्यांची केमिस्ट्री खुलून दिसली आहे. लोकांना ही जोडी भावली आहे. दिशासाठी तरुणाई क्रेझी आहे ज्याचा चित्रपटाला फायदाच होतोय. तिच्याबरोबर काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि मला ती खूपच गोड आणि प्रोफेशनल वाटली. प्रत्येकालाच ती आवडते. ती एक चांगली नर्तक देखील आहे आणि त्यामुळे शूटच्या वेळीही आम्हाला त्याचा फायदा झाला.”

Disha Patni has a huge craze in her youth
दिशा पाटनीची तरुणाईत आहे प्रचंड क्रेझ!

‘दिशाच्या या चित्रपटातील स्क्रीन प्रेसेन्झ खूप सुंदर आणि आकर्षकी आहे, तिचा हॉट आणि मोहक लूक, आणि सलमान खानबरोबरची केमिस्ट्री चाहत्यांना ‘राधे’ पुन्हा पुन्हा पाहायला भाग पाडत आहे. ‘सिटी मार’ आणि ‘झूम’ झूम’ मधील तिच्या ‘किलर’ डान्स मूव्ह्स प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत आणि त्यामुळेच ही गाणी चार्टबस्टर ठरली आहेत’ प्रभुदेवा पुढे म्हणाला.

Disha Patni has a huge craze in her youth
दिशा पाटनीची तरुणाईत आहे प्रचंड क्रेझ!

दिशा पाटनी ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’च्या यशामुळे खूप खुश आहे. तिचा आगामी चित्रपट आहे ‘एक व्हिलन रिटर्न्स’.

हेही वाचा - केदार शिंदे यांनी लॉकडाऊनमध्ये ७५० रुपयात केले दुसऱ्यांदा लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.