ETV Bharat / sitara

हिमाचलची असल्यामुळे मला वेगळ्या नजरेतून पाहिले गेले - कंगना

author img

By

Published : Oct 22, 2020, 1:52 PM IST

कंगना रणौतने आपल्या हिमाचल प्रदेश भेट देण्याचे आवाहन लोकांना केलंय. परंतु पर्यावरणाच्या रक्षणाची काळजी घेण्याचाही सल्ला तिने दिलाय. ती हिमाचलची असल्यामुळे लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहात होते ,असेही तिने म्हटलंय.

Kangana
कंगना

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरवर एक पोस्ट लिहून हिमाचल प्रदेशमध्ये येण्याचे आवाहन लोकांना केलंय. मात्र पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सल्लाही ती द्यायला विसरलेली नाही. ती हिमाचल प्रदेशची असल्यामुळे लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहात असत, असेही तिने लिहिलंय.

  • Himachal has become a new favourite for film shoots as well, initially when I told people I am from Himachal people didn’t know much about it they judged me for coming from a remote village, commercially it’s a good development, let’s make it ecologically beneficial as well 🙏

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये कंगना लिहिते, ''हिमाचल प्रदेश सध्या शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाण बनले आहे. सुरुवातीला मी जेव्हा लोकांना सांगायचे की मी हिमाचल प्रदेशची आहे, तेव्हा लोकांना याबद्दल फारसे समजत नव्हते. त्यांना वाटायचे की कुठल्या तरी दूरच्या गावातून आले आहे. कमर्शिअली आता याचा चांगला विकास झालाय. चला तर आपण पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभ देऊयात.''

  • Come to Himachal Pardesh but don’t throw plastic around especially single used plastic like empty bottles and chips packets, this beautiful valley can be turned in to a big dumpster just in one day if couple of insensitive, ill mannered city brats reach there. Please don’t 🙏 https://t.co/JxaZNqMdB1

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसऱ्या एका ट्विटमध्ये कंगनाने म्हटलंय, ''हिमाचल प्रदेशमध्ये जरुर या. परंतु प्लास्टिक विशेषतः रिकाम्या बाटल्या, चिप्सचे पॅकेट्स इत्यादी इथे फेकू नका. इथे असभ्य शहरी पोहोचले तर ही सुंदर दरी एक दिवस कचऱ्याचा ढीग बनू शकते. कृपया असे करु नका.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.