'गेहराइयां'बद्दल अनन्या पांडे म्हणते : भूमिका संवेदनाक्षम असल्याने माझी कमजोरी उघड झाली

'गेहराइयां'बद्दल अनन्या पांडे म्हणते : भूमिका संवेदनाक्षम असल्याने माझी कमजोरी उघड झाली
अनन्या पांडे आता चित्रपट निर्माते शकुन बत्रा यांच्या आगामी 'गेहराइयां' या चित्रपटात दिसणार आहे. अनन्याने एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनुभव आणि चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांमुळे तिला एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून विकसीत होण्यास मदत झाली. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आता चित्रपट निर्माते शकुन बत्रा यांच्या आगामी 'गेहराइयां' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा दिसणार आहेत. या चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना अनन्याने सांगितले की या चित्रपटाने तिला केवळ एक अभिनेत्री म्हणून विकसित होण्यास मदत केली नाही तर एक माणूस म्हणून तिच्या वाढीसही हातभार लावला आहे. दीपिका हे एक मोठे नाव असून सिद्धांतने आधीच आपली क्षमता सिद्ध केली असली तरी, अनन्याला असे कधीच वाटले नाही. तिला अनुभवाची कमतरता आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता, अनन्याने एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनुभव आणि चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांमुळे तिला एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून विकसीत होण्यास मदत झाली.
'गेहराइयां' चित्रपटामध्ये आधुनिक नातेसंबंधांच्या प्रभावाखाली दबून जाणे, प्रौढ बनणे आणि एखाद्याच्या जीवनाचा मार्ग नियंत्रित करणे सोडून देणे यावर भाष्य करण्यात आले आहे. अनन्याने या चित्रपटात टिया ही व्यक्तीरेखा साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तिला स्वतःला बरेच काही सोसावे लागले.
तिच्या भूमिकेबद्दल बोलताना अनन्याने सांगितले: "त्या अर्थाने हे अत्यंत विचित्र होते, परंतु मला वाटते की मी त्या भीतीवर मात करु शकले आणि माझ्यातील एक वेगळी बाजू दाखवू शकले.'' अनन्या पांडे पुढे म्हणाले की ती चित्रपटातील वास्तविक, खलनायकी आणि जटिल पात्रांकडे आकर्षित झाली आहे. "हे माझ्यासाठी सर्व लिखाणात होते - सर्व काही खूप प्रामाणिक आणि नैसर्गिक वाटले. मला वाटले की या भागासाठी मी स्वतःहून खूप काही पेलू शकते," असे अनन्या म्हणाली.
'गेहराइयां'मध्ये नसिरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. धर्मा प्रॉडक्शन, वायकॉम18 आणि शकुन बत्रा यांच्या जौस्का फिल्म्स यांच्या संयुक्तपणे निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
हेही वाचा - सुझान खान, वीर दाससह खुशी कपूरलाही कोरोनाची लागण
