ETV Bharat / science-and-technology

BYD electric vehicles : सेल्फ ड्राइव्ह नेपाळ BYD इलेक्ट्रिक वाहनांसाठी बनले भागीदार

author img

By

Published : Apr 25, 2022, 2:00 PM IST

Cimex Inc Pvt Ltd ने भाड्याच्या फ्लीट ऑपरेशनसाठी सेल्फ ड्राईव्ह नेपाळ प्रायव्हेट लिमिटेड Self Drive Nepal Pvt Ltd सोबत करार केला आहे. त्यांच्या e6 इलेक्ट्रिकच्या 50 युनिट्सचा पुरवठा करण्यासाठी भागीदारी केली आहे.

electric vehicles
electric vehicles

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या BYD इंडियाने Electric vehicle maker BYD India सोमवारी सांगितले की, त्यांच्या नेपाळी भागीदार, Cimex Inc Pvt Ltd ने भाड्याच्या फ्लीट ऑपरेशनसाठी सेल्फ ड्राईव्ह नेपाळ प्रायव्हेट लिमिटेड Self Drive Nepal Pvt Ltd सोबत करार केला आहे. त्यांच्या e6 इलेक्ट्रिकच्या 50 युनिट्सचा पुरवठा करण्यासाठी भागीदारी केली आहे. सेल्फ ड्राइव्ह नेपाळ - स्पार्क ग्रुपची उपकंपनी, BYD इलेक्ट्रिक वाहनांसाठी BYD electric vehicles भागीदार बनेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

गुहेश्वरी, काठमांडू येथील स्पार्क ग्रुप येथे एक BYD सेवा केंद्र देखील स्थापित केले जाईल, हे 2022 मध्ये कार्यान्वित होणार आहे. "आम्ही नेपाळमध्ये BYD च्या हिरव्या तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पर्याय शोधत आहोत. आम्हाला योग्य भागीदार सापडला आहे, असे Cimex Inc सीईओ साहिल श्रेष्ठ म्हणाले. सेल्फ ड्राईव्हचे सीईओ रोशन पोखरेल म्हणाले, "BYD चे e6 प्रवाशांना आराम, चांगली रेंज आणि जलद चार्जिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सर्व गरजा पूर्ण करेल."

हेही वाचा - Realme GT 2 : भारतात 28 एप्रिलपासून Realme GT 2 ची होणार विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.