ETV Bharat / science-and-technology

OpenAI offers Up To 20K Dollars : ओपन एआय आता चॅट जीपीटीमधील सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी देणार 20 हजार डॉलर्स

author img

By

Published : Apr 12, 2023, 3:27 PM IST

OpenAI offers Up To 20K Dollars
संग्रहित छायाचित्र

चॅट जीपीटीमध्ये असलेले बग शोधणाऱ्यांना 20K डॉलर देण्यात येणार असल्याची घोषणा ओपन एआयने केली आहे. मागील महिन्यात चॅट जीपीटीच्या वापरकर्त्यांची पेमेंट हिस्ट्री इतर वापरकर्त्यांना दिसली होती.

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या मालकीची असलेल्या ओपन एआयने चॅट जीपीटीतील सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी 20 हजार डॉलरची ऑफर दिली आहे. कंपनीला गुड फेथ हॅकिंग आणि तांत्रिक हल्ल्यातील फरक ओळखण्यात यामुळे मदत होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात सुरक्षेतील त्रुटीचा सामना चॅट जीपीटीला करावा लागला होता. ओपन एआयने चॅट जीपीटी आणि इतर उत्पादनांसाठी बग बाउंटी कार्यक्रम सुरू केला आहे. ओपन एआय या निष्कर्षांसाठी बगक्राऊड व्हल्नरेबिलिटी रेटिंग टॅक्सोनॉमी वापरणार असल्याची माहितीही कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

थर्ड पार्टी शोधू शकतात बग : ओपन एआयने जाहीर केलेल्या या बक्षिसाव्यतिरिक्त चॅट जीपीटी आणखीही बक्षिस देणार असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यात कमी महत्वाचा बग शोधल्यास 200 डॉलर किवा त्यापेक्षाही मोठा बग शोधल्यास कंपनी मोठी रक्कम देणार असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एखादा खूप महत्वाचा बग शोधल्यासच कंपनी 20 हजार डॉलरचे बक्षिस देणार आहे. सुरक्षा संशोधकांनी तयार केलेल्या प्लगइनवर सुरक्षा चाचणी घेण्यास अधिकृत नाहीत. ओपनएआय एथिकल हॅकर्सना गोपनीय ओपनएआय कॉर्पोरेट माहितीचे रक्षण करण्यास सांगत आहे. ती थर्ड पार्टीद्वारे उघड होऊ शकते. यात गुगल वर्कप्लेस, असाना, ट्रेलो, जीरा, झेंडेस्क आदी विविध वर्कप्लेसचा समावेश असल्याची माहितीही कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

त्रुटी शोधण्यापुरते मर्यादित : ओपन एआयने जाहीर केलेल्या या योजनेत इतर वर्क प्लेसवर बग शोधणारे या योजनेत समाविष्ट करण्यात येणार नसल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ही गोपनियतेची चाचणी असून त्याला विविध अटी आणि शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासह ओपन एआय या कंपन्यांसोबत व्यवसाय करतेच असे नाही, त्यामुळे ते बग शोधण्यापुरतेच मर्यादित आहे. ओपन सोर्स लायब्ररीमधील बगमुळे चॅट जीपीटी ऑफलाइन झाले होते. त्यामुळे काही वापरकर्त्यांना दुसर्‍या सक्रिय वापरकर्त्यांच्या चॅट इतिहासातील शीर्षके पाहता आली. ओपन एआय OpenAI याच बगमुळे विशिष्ट नऊ तास विंडोदरम्यान सक्रिय असलेल्या चॅट जीपीटीच्या ChatGPT Plus सदस्यांपैकी 1.2 टक्के पेमेंट संबंधित माहितीची इतरांना पाहता आली. याबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्त करुन तो बग सुधारल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा - Twitter Blue Tick Subscription : एलॉन मस्कची नवीन घोषणा, यूजरला ट्विटर व्हेरिफिकेशन ब्लू चेकमार्कसाठी द्यावे लागतील 'इतके' पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.