ETV Bharat / science-and-technology

Paid Verification For FB And Insta : इंस्टाग्राम, फेसबुक व्हेरिफिकेशनला आता मोजा पैसे, मार्क झुकेरबर्गच्या घोषणेवर एलन मस्कची 'ही' प्रतिक्रिया

author img

By

Published : Feb 20, 2023, 3:39 PM IST

फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी रविवारी केली. त्यांच्या या घोषणेवर एलन मस्क यांनी अपरिहार्य अशी कमेंट केली आहे.

Zuckerberg announces paid verification for FB And Insta
संपादित छायाचित्र

हैदराबाद : मेटाने इंस्टाग्राम आणि फेसबुक व्हेरिफिकेशनसाठी पैसे लागणार असल्याची घोषणा रविवारी केली. यावेळी त्यांनी वेबसाठी 11.99 डॉलर तर 14.99 डॉलर हे फोनवर वापरण्यासाठी लागणार असल्याची घोषणा केली. दुसरीकडे मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मेटा व्हेरिफाईड बॅज देण्याची घोषणा केली. ग्राहकांची सोयीसाठी हे बॅज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये लवकरच होणार सुरू : मार्क झुकेरबर्ग यांनी मेटाकडून देण्यात येणारे बॅज अगोदर ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड या दोन देशात सुरू होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर कंपनी हळूहळू इतर देशातही ही सुविधा लागू करणार असल्याचेही झुकेरबर्ग यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये नमूद केले. या आठवड्यात कंपनी हे व्हेरिफिकेशन बॅज देणार आहे. यात आपले अकाऊंट सरकारी आयडी वापरुन व्हेरिफायईड करुन मिळेल. व्हेरिफायईड अकाऊंटला ब्लू बॅज लागणार आहे. इतर फसवेगिरी करणाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचेही यावेळी कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासह ग्राहक प्रतिनिधींसोबत बोलण्यासाठीही सुविधा मिळणार असल्याचेही मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

१८ वर्ष वरच्या नागरिकांचेच होणार व्हेरिफिकेशन : मार्क झुकेरबर्ग यांनी मेटा व्हेरिफिकेशन करुन बॅज देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी मेटाला सरकारी प्रमाणपत्र लागणार आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी ग्राहकांना काही मर्यादित अॅक्टिव्हीटीसह १८ वर्षाच्या वरील असल्याचा पुरावा म्हणून सरकारी कागदपत्र लागणार असल्याची माहितीही दिली. त्यामुळे केवळ १८ वर्षाच्या वरील तरुणांनाच मेटा व्हेरिफिकेशन बॅज मिळणार असल्याचे त्यातून सूचित केले आहे.

मेटाच्या ट्विटवर एलन मस्कची कमेंट : मेटाने आपल्या ग्राहकांच्या व्हेरिफिकेशनसाठी पैसे लागणार असल्याची घोषणा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मेटाने ही घोषणा आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टवर केली. मेटाच्या या पोस्टवर एलन मस्क यांनी अपरिहार्य अशी कमेंट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. नुकतीच ट्विटरने आपल्या ग्राहकांना व्हेरिफिकेशन करण्यासाठी १२ डॉलर इतकी रक्कम आकारली होती. त्यामुळे मेटानेही आता व्हेरिफिकेशन करण्यासाठी चार्ज आकारल्याने मेटाने ट्विटरची कॉपी केल्याचे बोलले जात आहे.

एलन मस्कच्या सल्लागाराने केले ट्विट : ट्विटरचे माजी कार्यकारी अधिकारी आणि एलन मस्कचे सल्लागार श्रीराम कृष्णन यांनी एलन मस्क यांना संबोधत आपल्याला जुन्या व्हेरिफिकेशन पद्धतीचा तिरस्कार असल्याचे ट्विट केले. जुन्या पद्धतीत लोकांचे ट्रेंडींग, घोटाळे आदी होते. त्यामुळे ही पद्धत अगदी चांगली असल्याचेही कृष्णन यांनी यावेळी सांगितले. त्यावर एलन मस्क यांनी अगदी बरोबर असे उत्तर दिले. मात्र या ट्विटवर यूजर अनेक मजेदार कमेंट करत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - Chat GPT Interview : चॅट जीपीटीने घेतली दिग्गजांची मुलाखत, या प्रश्नांवर गोंधळले ऋषी सुनक आणि बिल गेट्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.