ETV Bharat / science-and-technology

Dell Lay Off : आता 'डेल'ही करणार नोकर कपात! वाचा किती जणांच्या नोकऱ्या जाणार

author img

By

Published : Feb 6, 2023, 2:36 PM IST

Dell
डेल

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'डेल'ने नोकर कपातीची घोषणा केली आहे. एका अहवालानुसार, डेल आणि इतर हार्डवेअर उत्पादकांना महामारीच्या काळात मागणी कमी झाली आहे.

सॅन फ्रान्सिस्को : ख्यातनाम टेक्नॉलॉजी कंपनी 'डेल'ने सोमवारी सांगितले की ते जगभरात सुमारे 6,650 कामगारांना कामावरून कमी करणार आहेत. असे करणारी डेल ही अ‍ॅमेझॉन, गुगल, स्पॉटीफाय तसेच मायक्रोसॉफ्ट नंतर नवीनतम तंत्रज्ञान कंपनी बनणार आहे. या कपातीमध्ये कंपनीच्या जागतिक कर्मचार्‍यांपैकी 5 टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, असा सूत्रांचा अहवाल आहे.

महामारीच्या काळात मागणी घटली : डेलचे सह चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क म्हणाले की, सध्या त्यांची कंपनी बाजारातील अनिश्चिततेचा अनुभव घेत आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या नोकर कपातीला विभागाची पुनर्रचना आणि कार्यक्षमता वाढवण्याची संधी म्हणून पाहिली जाणार आहे. एका अहवालानुसार, डेल आणि इतर हार्डवेअर उत्पादकांना महामारीच्या काळात मागणी कमी झाली आहे.

लेनोवोने टाकले डेलला मागे : इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन नुसार 2022 मध्ये भारतीय कम्प्यूटर बाजार 11.7 टक्क्यांनी घसरला आहे. आठ वर्षांच्या ग्रोथ नंतर सप्टेंबरच्या तिमाहीत 30 लाख 90 हजार कम्प्यूटर युनीट्सची विक्री झाली आहे. एचपीने या काळात 9,40,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली. लेनोवोने मार्केटमध्ये डेलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. ग्राहक विभागातील गती गमावल्यामुळे डेल टेक्नॉलॉजीज तिसऱ्या क्रमांकावर घसरली.

स्पॉटीफायची घोषणा : यापूर्वी म्यूझिक स्ट्रीमिंग दिग्गज स्पॉटीफायने जागतिक स्तरावर 6 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 600 कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी अ‍ॅमेझाॅननेही जागतिक स्तरावर 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यात भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका ट्रॅकिंग साइटवरील डेटानुसार, 2022 मध्ये, 1,000 हून अधिक कंपन्यांनी सुमारे 154,336 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

मायक्रोसॉफ्टनेही केली कपातीची घोषणा : गेल्या महिन्यात गुगलने आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. कंपनीची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी ही छाटणी गरजेचे असल्याचे कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले होते. त्या अगोदर मायक्रोसॉफ्टनेही 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. तसेच फेसबुकनेही मेटाच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे. जगभरात मंदीची लाट येणार असे निश्चित होते. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार हेही मानण्यात आले होते. आता त्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत.

हेही वाचा : No Layoffs At Apple : ॲपलने इतर टेक कंपन्यांप्रमाणे नोकऱ्या कमी केल्या नाहीत, जाणून घ्या याची संभाव्य कारणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.