ETV Bharat / science-and-technology

Apple IPhone 15 Sale : पहिल्याच दिवशी आयफोन 15 च्या विक्रीनं मोडला रेकॉर्ड, आयफोन 14 पेक्षा झाली 100 टक्के जास्त विक्री

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 9:52 AM IST

Apple iPhone 15 Sale : अ‍ॅपलच्या 'आयफोन 15'च्या विक्रीनं सगळे रेकॉर्ड मोडल्याचं पहायला मिळत आहे. 'आयफोन 14' च्या तुलनेत 'आयफोन 15' ची खरेदी 100 पट जास्त झाल्याची माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. आयफोनचं हे लेटेस्ट मॉडेल खरेदी करण्यासाठी अ‍ॅपल्या स्टोअरसमोर रांगा लागत आहेत.

Apple iPhone 15 Sale
आयफोन खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह

नवी दिल्ली Apple iPhone 15 Sale : सप्टेंबर महिना हा गॅझेटप्रेमींसाठी कमालीचा औत्सुक्याचा असतो. दरवर्षी याच महिन्यात अ‍ॅपल कंपनी आयफोनचं नवं मॉडेल लॉंच करते. अपवाद वगळता गेल्या काही वर्षांचा हा शिरस्ता आहे. यावर्षी 'आयफोन 15' लाँच होण्याचे गॅझेटप्रेमींना वेध लागले होते. आयफोन स्टोअरमध्ये हा फोन दाखल झाल्यानंतर लगेचच 'आयफोन 15' नं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'आयफोन 15'ची विक्री 'आयफोन 14' पेक्षा 100 टक्के जास्त झाल्याचं पहिल्या दिवशीच्या आयफोन विक्रीवरुन उघड झालं आहे. 'आयफोन 15' घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अ‍ॅपल स्टोअर्ससमोरही लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं आहे.

पहिल्यांदाच 'मेड इन इंडिया' आयफोन बाजारात : 'अ‍ॅपल' कंपनीनं पहिल्यांदाच 'मेड इन इंडिया' आयफोन बाजारात आणला आहे. भारतात बनवलेल्या अ‍ॅपलच्या आयफोनला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आयफोन 15 खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. भारतीय बनावटीच्या आयफोन 15 बाबत ग्राहकांमध्ये मोठा उत्साह असल्याचं दुकानांसमोर लागलेल्या लांबच लांब रांगावरुन स्पष्ट होत आहे. अ‍ॅपलनं पहिल्यांदाच मेड इन इंडिया 'आयफोन 15' बाजारात आणल्याची माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे 'आयफोन 15' : भारतीय बनावटीच्या आयफोन 15 नं बाजारात मोठी गर्दी खेचली आहे. भारतीय बनावटीच्या आयफोनला जागतिक पातळीवरही मोठी मागणी असल्याची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅपल कंपनीनं 'आयफोन 15' विविध व्हेरियशनमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आकर्षक व्हेरियशन असल्यानं 'आयफोन 15' ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. अ‍ॅपलनं आयपोन 15 गुलाबी, पिवळा, निळा, काळा अशा विविध रंगात उपलब्ध करुन दिला आहे.

काय आहे 'आयफोन 15' ची किंमत आणि स्टोरेज कॅपॅसिटी : अ‍ॅपल कंपनीनं आयफोन 15 मध्ये विविध फिचर्स दिले आहेत. त्यासह आकर्षक असलेल्या 'आयफोन 15' मध्ये 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज कॅपॅसिटी सुविधा दिली आहे. त्याची किंमत अनुक्रमे 79 हजार 900 आणि 89 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन '15 Pro Max' ची किंमत 1 लाख 34 हजार 900 रुपयापासून सुरू होत आहे. आयफोन 15 Pro Max मध्येही 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 TB मेमरी स्टोरेज क्षमता उपलब्ध करुन दिली आहे. 'आयफोन 15 Pro Max' ची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये इतकी आहे. ग्राहक पहिल्यांदाच दिल्ली आणि मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरमधून आयफोन खरेदी करु शकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. iPhone 15 launch in Mumbai : आयफोन खरेदीसाठी बीकेसीतील ॲपल शोरूम बाहेर राज्याबाहेरील ग्राहकांची झुंबड, आयफोन 15 मुंबईत उपलब्ध
  2. Apple iPhone १५ Series : आयफोन खरेदीसाठी मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर नागरिकांची गर्दी; 15 सिरीज भारतात उपलब्ध
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.