आयओएसवरून अँड्राईडवर व्हॉट्सअपची हिस्ट्री पाठविणे शक्य होणार

author img

By

Published : Jul 30, 2021, 4:56 PM IST

व्हॉट्सअप

प्ले स्टोअरमध्ये डेटा रिस्टोर टूलचे व्हर्जन 1.0.382048734 अपडेट झाले आहे. त्यामध्ये व्हॉट्सअप चॅट आणि हिस्ट्री ही आयफोनद्वारा अँड्राईड फोनमध्ये कॉपी करण्याचा पर्याय असणार आहे.

सॅन फ्रान्सिस्को - व्हॉट्सअपने वापरकर्त्यांसाठी खास सुविधा आणली आहे. आयओएसच्या वापरकर्त्यांना त्यांची व्हॉट्सअप हिस्ट्रीही अँड्राईडवर पाठविणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सअपमध्ये मोठी त्रुटी आहे. एकावेळी एकाच स्मार्टफोनवर व्हॉट्सअपच्या संदेशाची माहिती मिळते. फोन ऑफलाईन असतानाही व्हॉट्सअप वेब आणि डेस्कटॉपवरही व्हॉट्सअप सुरू राहू शकते. मात्र, या सेवेतही एकाच स्मार्टफोनवरील संदेश मिळू शकतात.

जर चॅट अँड्राईड आणि आयओएसमध्ये नसेल तर दुसऱ्या डिव्हाईसमध्ये तर ती माहिती सोप्या पद्धतीने पाठविणे शक्य होत नाही. अँड्राईडमध्ये डेटा रिस्टोर टूल नावाचे इन बिल्ट डिव्हाइस टू डिव्हाइस ट्रान्सफर अॅप आहे. त्याचा उपयोग अँड्राईड सेटअप विझार्डद्वारे आयओएससहित एका फोनमधून दुसऱ्या फोनमधून फोटो, अॅप आणि फाईल कॉपी करण्यासाठी केला जातो.

हेही वाचा-पीगासस हेरगिरी प्रकरण : 500 लोकांसह संघटनांकडून सरन्यायाधीशांना हस्तक्षेप करण्याची विनंती

मायग्रेशन सेटिंग्जचे लाँचिंग होण्याची वाट पाहावी लागणार

प्ले स्टोअरमध्ये डेटा रिस्टोर टूलचे व्हर्जन 1.0.382048734 अपडेट झाले आहे. त्यामध्ये व्हॉट्सअप चॅट आणि हिस्ट्री ही आयफोनद्वारा अँड्राईड फोनमध्ये कॉपी करण्याचा पर्याय असणार आहे. मात्र, व्हॉट्सअप चॅट हे आयओएसमधून अँड्राईडमध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय डेटा रिस्टोर टूलमध्ये दिसणार नाही. त्यासाठी व्हॉट्सअपने नवीन मायग्रेशन सेटिंग्जचे लाँचिंग करण्याची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा-भगतसिंगची भूमिका करताना गळ्याला लागली फाशी...10 वर्षाचा मुलाचा मृत्यू

व्हॉट्सअप काही बीटा टेस्टर्ससाठी मल्टी डिव्हाईस बीटा प्रोग्राम लाँच करणार आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांना फोनवर इंटरनेटशिवाय व्हॉट्सअप वेब, व्हॉट्पअप डेस्कटॉप आणि पोर्टल वापरण्याची सुविधा असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.