ETV Bharat / international

Nita Ambani Saree : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात निता अंबानींच्या साडीची चर्चा; पाहा फोटो

author img

By

Published : Jun 23, 2023, 2:17 PM IST

Updated : Jun 23, 2023, 2:25 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्टेट डिनरसाठी नीता अंबानीने हस्तिदंती सोनेरी साडी घातली होती. गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. नीता अंबानी यांनी त्यांचे पती, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबत व्हाईट हाऊसमधील स्टेट डिनरला हजेरी लावली होती

Nita Ambani Saree
निता अंबानीची साडी

वॉशिंग्टन : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात निता मुकेश अंबानीच्या साडीची चर्चा होत आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्टेट डिनरसाठी नीता अंबानीने पारंपारिक पेहराव केला होता. त्यांनी या कार्यक्रमासाठी हस्तिदंती साडीची निवड केली होती. सुशोभित बॉर्डरसह सूक्ष्म सोनेरी काठांच्या बॉर्डरसोबत त्यांनी मॅचिंग ब्लाउज असा लूक केला होता. नीता अंबानीच्या साडीचा सॉफ्ट कलर पॅलेट पाश्चात्य सौंदर्यशास्त्राला पूरक आहे. त्यांच्या साडीतील शुद्ध सोनेरी धागा, चमकदार फॅब्रिक आणि सिल्हूट भारताच्या समृद्धीचे प्रदर्शन करते.

Nita Ambani Saree
सुंदर पिचाई आणि अंजली पिचाई सोबत नीता अंबानी आणि मुकेश अंबानी

निता अंबांनी यांचा मेकअप : त्यांनी केलेहा पेहराव हा अतिशय अप्रतिम होता. त्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. दागिन्यांमध्ये निता अंबांनीनी मोत्याचा हार, जड कानातले, हातात चमकदार कडे आणि एक अलंकृत अंगठी घातलेली होती. त्यांनी केलेला पेहराव हा त्यामुळे अजूनच खुलला होता. त्या नेहमी आपल्या पेहरावासाठी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी कमीत कमी मेकअप केलेला होता. गुलाबी ओठ, परिभाषित भुवया आणि बिंदीने त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व्यक्त केले होते.

यूएस स्टेट डिनरला हजेरी : निता अंबांनी यांनी त्यांचे केस एका गोंडस अंबाड्यात बांधले होते, त्याला गजऱ्याने सजवले होते. निता अंबानी व मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमासाठी भारतीय पेहरावाची निवड केली होती. जी अत्यंत योग्य ठरली. आनंद महिंद्रा, इंद्रा नूयी, निखिल कामथ, सत्या नडेला आणि फॅशन डिझायनर करिश्मा स्वाली यांनीही यूएस स्टेट डिनरला हजेरी लावली होती. सुंदर पिचाई आणि अंजली पिचाई नीता हे अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या डिनरमध्ये झळकले होते.

हेही वाचा :

Nita Ambani On Piyush Chawla : नीता अंबानी बनल्या पियुष चावलाच्या आक्रमक गोलंदाजीच्या फॅन, त्याला दिला 'हा' विशेष पुरस्कार

NMACC Gala Day 2 : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर कार्यक्रमांमध्ये हॉलिवूड, बॉलीवूड सेलिब्रिटींची शानदार एन्ट्री; पाहा फोटो

अरंगेत्रम : अंबानीच्या होणाऱ्या सुनेने दिग्गज रसिकांना केले मंत्रमुग्ध

Last Updated :Jun 23, 2023, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.