ETV Bharat / international

Shinzo Abe : कोण आहेत जपानचे शिंजो आबे? ज्यांच्यावर आज सकाळी झाला आहे गोळीबार

author img

By

Published : Jul 8, 2022, 1:45 PM IST

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे आज सकाळी भाषण सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात ( Shinzo Abe has been shot ) आल्या. पोलिसांनी हल्लेखोराला पकडले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Shinzo Abe
शिंजो आबे

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी भाषण करताना गोळ्या झाडण्यात ( Shinzo Abe has been shot ) आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले आहेत. शिंजो आबे यांनी 2020 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

शिंजो आबे दोन वेळा जपानचे पंतप्रधान झाले. शिंजो आबे 2006 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर शिंजो आबे 2012-2020 पर्यंत पंतप्रधान होते. शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता. भारत सरकारने शिंजो आबे यांना पद्मविभूषण ( Padma Vibhushan Shinjo Abe ) देऊन सन्मानित केले आहे.

शिंजो आबे हे राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत -

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे ( Japan former pm shinzo abe ) हे एका राजकीय कुटुंबातील आहेत. शिंजो आबे यांचे आजोबा नोबुसुके किशी हे देखील जपानचे पंतप्रधान होते. नोबुसुके किशी हे 1957-60 पर्यंत जपानचे पंतप्रधान ( Former pm Nobusuke Kishi ) होते. त्याच वेळी, शिंजो आबे यांचे वडील शिंतारो आबे हे 1982-86 पर्यंत जपानचे परराष्ट्र मंत्री होते. शिंजो आबे 2006 मध्ये पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. मात्र, आजारपणामुळे त्यांनी 2007 मध्ये राजीनामा दिला होता. यानंतर 2012 मध्ये शिंजो आबे पुन्हा जपानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर ते 2020 पर्यंत सतत जपानचे पंतप्रधान होते.

सर्वाधिक वेळा भारताला भेट देणारे जपानचे पंतप्रधान -

शिंजो आबे ( shinzo abe ) हे जपानचे पंतप्रधान होते, ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळा भारताला भेट दिली. शिंजो आबे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (2006-07) पहिल्यांदा भारतात आले होते. शिंजो आबे यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात (2012-2020) तीनदा भारताला भेट दिली. जानेवारी 2014, डिसेंबर 2015 आणि सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती.

हेही वाचा - G20 Foreign Ministers Meeting : इंडोनेशियाच्या बालीमध्ये आज जी २० देशांच्या विदेशमंत्र्यांची बैठक.. 'या' विषयावर होणार चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.