ETV Bharat / international

India to Sign Artemis Accords : इस्त्रो नासा 2024 मध्ये लाँच करणार संयुक्त अंतराळ मोहीम, भारत आर्टेमिस अ‍ॅकॉर्डमध्ये होणार सामील

author img

By

Published : Jun 23, 2023, 9:52 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टेमिस अ‍ॅकॉर्डमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मोहीम सुरू करणार आहे.

India to Sign Artemis Accords
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात थोड्या वेळाने द्विपक्षिय बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टेमिस अ‍ॅकॉर्डमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अंतराळ संशोधनावर समविचारी देशांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी नासा आणि इस्रो 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर संयुक्तपणे मोहीम लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारत आर्टेमिस करारावर करणार स्वाक्षरी : भारत आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करत आहे, हा करार सर्व मानवजातीच्या फायद्यासाठी अंतराळ संशोधनात एक समान दृष्टीकोन वाढवत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 1967 (OST) च्या बाह्य अवकाश करारामध्ये आधारलेले आर्टेमिस अ‍ॅकॉर्ड्स हे 21 व्या शतकात नागरी अंतराळ संशोधन आणि वापरास मार्गदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेल्या तत्त्वांचे बंधनकारक नसलेले करार आहे. 2025 पर्यंत मानवांना चंद्रावर नेण्याचा हा अमेरिकन नेतृत्वाचा प्रयत्न आहे. यामध्ये मंगळावर आणि त्यापलीकडे अंतराळ संशोधनाचा विस्तार करण्याचे अंतिम लक्ष्य असल्याचेही यावेळी व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.

नासा आणि इस्रो करणार संयुक्त मोहीम : नासा आणि इस्रो या वर्षी अंतराळ उड्डाण सहकार्यासाठी एक धोरणात्मक फ्रेमवर्क विकसित करत आहे. याव्यतिरिक्त नासा आणि इस्रोने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर संयुक्त मोहिमेवर सहमती दर्शविली आहे. सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यासाठी अमेरिकन कंपन्या भारतासोबत भागीदारी करत आहेत. भारतीय राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशनच्या मदतीसह मायक्रोन टेक्नॉलॉजीने 800 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळून 2.75 अब्ज डॉलर सेमीकंडक्टर असेंब्ली आणि भारतात चाचणी सुविधा उपलब्ध होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

60 हजार भारतीय अभियंत्यांना देणार प्रशिक्षण : यूएस अप्लाइड मटेरिअल्सने भारतात व्यापारीकरण आणि नवीन उपक्रमासाठी नवीन सेमीकंडक्टर सेंटरची घोषणा केली आहे. लॅम्ब रिसर्च ही दुसरी सेमीकंडक्टर उत्पादन उपकरण कंपनी भारताच्या सेमीकंडक्टर वर्कफोर्स डेव्हलपमेंटच्या उद्दिष्टांना गती देणार आहे. यासाठी कंपनी 60 हजार भारतीय अभियंत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करणार आहे. यासाठी विविध खनिजे सुरक्षेबाबतही भारताला खनिज सुरक्षा भागीदारीचा सदस्य होण्यासाठी आपला पाठिंबा जाहीर करेल. याचे नेतृत्व यूएस स्टेट डिपार्टमेंट करत आहे. ही कंपनी खनिज पुरवठा साखळी मजबूत करुन बाजारांना आवश्यक महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा चांगल्या प्रकारे केला जातो याची खात्री करते.

हेही वाचा -

  1. Milestone in India US Defence Cooperation: आता भारत अमेरिकेसोबत मिळून करणार फायटर जेटचे उत्पादन, अमेरिकन कंपनीचा भारतासोबत करार
  2. PM Modi Speech : भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा ध्वज आकाशात उंच फडकत राहो, पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमधील भाषण गाजले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.