ETV Bharat / international

Death Valley Visitors : Death Valley Visitors : उष्णतेच्या तीव्र झळीतही डेथ व्हॅलीत पर्यटकांचा ओढा कायम, जाणून घ्या या कुप्रसिद्ध वाळवंटात का येतात पर्यटक

author img

By

Published : Jul 14, 2023, 1:59 PM IST

Updated : Jul 14, 2023, 2:33 PM IST

ग्लोबल वार्मिंगमुळे तापमानात वाढ होण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करतात. त्यातच अमेरिकेतील उष्णतेच्या लाटांमध्ये अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. मात्र तरीही पर्यटक कॅलिफोर्निया नेवाडा सीमेवरील डेथ व्हॅली या कुप्रसिद्ध वाळवंटाला भेट देण्यासाठी येतात.

Death Valley Visitors
संग्रहित छायाचित्र

कॅलिफोर्निया : उष्णतेच्या तिव्र झळीतही डेथ व्हॅलीत पर्यटकांचा ओढा कायम असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील या कुप्रसिद्ध वाळवंटातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वाळवंट कॅलिफोर्निया नेवाडा सीमेवर आहे. या वाळवंटात आलेल्या पर्यटकांना वेळेवर उपचार मिळणेही शक्य होत नाही. तरीही या वाळवंटात पर्यटक येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

धावपटू डॅनियल ज्युसेहसने काढला फोटो : या वाळवंटात अनेक परदेशी पर्यटक भेटी देतात. मात्र इतके मोठे तापमान असतानाही पर्यटकांची रिघ डेथ व्हॅलीला लागलेली असते. जर्मनीचा धावपटू डॅनियल ज्युसेहसने या आठवड्याच्या सुरुवातीला फर्नेस क्रीक व्हिजिटर सेंटरच्या बाहेरील थर्मामीटरचा फोटो काढला. या उन्हाच्या झळीत त्याने स्वतःला धावण्यासाठी आव्हान दिले. यावेळी डॅनियल ज्युसेहसने मला इतके गरम वाटत नव्हते, परंतु माझे शरीर थंड करण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम करत होते, असे स्पष्ट केले. धावपटू डॅनियल ज्युसेहसने काढलेल्या फोटोमध्ये 120 डिग्री फॅरेनहीट म्हणजे आपल्याकडचे 48. 8 डिग्री सेल्ससिअस इतके तापमान दाखवले आहे.

एकाच वेळी सर्वात थंड, सर्वात उष्ण तापमान : डेथ व्हॅलीला फिरण्यास येणारे पर्यटक हे त्यांच्या वातानुकूलित वाहनांमधून येतात. त्यानंतर मात्र ते सगळ्यात उष्ण असणाऱ्या डेथ व्हॅलीच्या तापमानात फिरतात. या वाळवंटात सगळ्यात कोरडे वातावरण आहे. त्यामुळे पर्यटकांना एकाच वेळी सगळ्यात थंड वातावरणाचा अनुभव मिळतो. त्यासह डेथ व्हॅलीतील तापमान जास्त असल्याने पर्यटकांना सगळ्यात उष्ण तापमानाचा अनुभव येतो. तर वाळंटातील वातावरण सगळ्यात कोरडे असल्याने त्याचाही अनुभव पर्यटक घेतात. त्यामुळे एकाच वेळी तिन्ही ऋतूंचा अनुभव पर्यटकांना या डेथ व्हॅलीत मिळतो.

डेथ व्हॅलीमध्ये शनिवार रविवारी असते 54.4 सेल्सिअस तापमान : डेडेथ व्हॅलीमध्ये प्रचंड तापमान असूनही पर्यटक या व्हॅलीमध्ये फिरण्यास येतात. शनिवारी आणि रविवारी डेथ व्हॅलीमध्ये तब्बल 54.4 अंश सेल्सिअस तापमान असते. ते तापमान त्याच्या वरही जाऊ शकते. त्यामुळे डेथ व्हॅलीमध्ये सकाळी बाहेर जाण्याचा सल्ला देतात. रात्रीचे तापमानही डेथ व्हॅलीत तब्बल 32.2 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. डेथ व्हॅलीमध्ये आतापर्यंतचे सगळ्यात उच्चांकी तापमान 56.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. या तापमानाची नोंद जुलै 1913 मध्ये करण्यात आली होती. इतर उद्यानांमध्ये हायकर्ससाठी दीर्घकालीन सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऍरिझोनामधील ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कमध्ये तर अधिकारी लोकांना आतील कॅन्यनमध्ये बहुतेक दिवस त्यांच्यापासून दूर राहण्याचा इशारा देत आहेत. येथील तापमान 20 सेल्सिअस जास्त असू शकते. पश्चिम टेक्सासमधील रिओ ग्रँडेजवळील बिग बेंड नॅशनल पार्कमध्ये किमान 43.3 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या वेळी ट्रेल्सपासून दूर राहणे चांगले असल्याचे नॅशनल वेदर सर्व्हिसने स्पष्ट केले आहे.


Last Updated : Jul 14, 2023, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.