ETV Bharat / international

Blast In Kabul : काबूलमधील लष्करी विमानतळाबाहेर मोठा स्फोट; 10 ठार, 8 गंभीर

author img

By

Published : Jan 1, 2023, 7:21 PM IST

Blast In Kabul
Blast In Kabul

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील लष्करी तळावर झालेल्या स्फोटात (Blast outside military airport in Kabul) 10 जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. (Blast In Kabul).

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील लष्करी तळावर रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला. (Blast outside military airport in Kabul). या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Blast In Kabul). अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी टेकर यांनी ही माहिती दिली.

हल्याची जबाबदारी अद्याप घेतली नाही : प्रवक्त्याने सांगितले की, आज सकाळी लष्करी विमानतळाच्या गेटबाहेर स्फोट झाला आणि दुर्दैवाने आमचे काही नागरिक ठार आणि जखमी झाले. अधिक माहिती न देता त्यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

तीन दिवसांत दूसरा स्फोट : तीन दिवसांपूर्वीच तालुकान शहरात मोठा स्फोट झाला होता, त्यात 4 जण जखमी झाले होते. तालुकान शहर ही तखार प्रांताची राजधानी आहे. तालिबान सुरक्षा कमांडर अब्दुल मोबीन साफी यांनी तखरमध्ये हल्ला झाल्याची पुष्टी केली. स्थानिक प्रशासनाच्या एका कर्मचाऱ्याच्या डेस्कखाली हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इराणच्या खम्मा प्रेसने ही माहिती दिली. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर गेल्या काही वर्षभरात अशाप्रकारचे हल्ले फार वाढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.