ETV Bharat / international

हमजा बिन लादेनचा 'ब्लॅक लिस्ट'मध्ये समावेश, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा निर्णय

author img

By

Published : Mar 2, 2019, 3:38 PM IST

हमजा बिन लादेन

'अल कायदाच्या अल जवाहिरी याने सौदी अरेबियात जन्म झाले हमजा बिन लादेन हा अल कायदाचा अधिकृत सदस्य असल्याचे म्हटले होते. हमजा याने अल कायदाच्या अनुयानांना अधिकाधिक दहशतवादी हल्ले घडवण्याचा आदेश दिला आहे,' असे सुरक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रे - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि वारस हमजा बिन लादेन याचा 'ब्लॅक लिस्ट'मध्ये समावेश केला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेची सूत्रे हमजा याच्याकडे येण्याची शक्यता लक्षात घेऊन सौदीने काल त्याचे नागरिकत्व रद्द केले होते. तर, आज यूएनएससीने हमजाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे.

अमेरिकेने ठार केलेल्या दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या अनेक मुलांपैकी २९ वर्षीय हमजा हा त्याचा वारस ठरणार आहे. ओसामाचा सहकारी अयमान अल जवाहिरी याच्याकडे सध्या अल कायदाची सर्व सूत्रे आलेली आहेत. त्याच्यानंतर ती हमजाकडे येण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे. आता यूएनएससीने त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याने त्याच्यावर अनेक निर्बंध येणार आहेत. यामध्ये प्रवासावरील निर्बंध, मालमत्ता गोठवणे, शस्त्रे-हत्यारे बाळगण्यास बंदी यांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इसिस (ISIS) आणि अल कायदा यांच्यावर बंदी घालणाऱ्या १२६७व्या समितीने हमजाला 'मोस्ट वाँटेड' घोषित केले होते. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास १ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. यानंतर सौदी अरेबियाने राजाच्या हुकुमाने त्याचे नागरिकत्व रद्द केले.

ही शिक्षा सुनावणाऱ्या समितीने नामित केलेल्या सर्व संस्था, गट आणि व्यक्तींचे सर्व पैसा, इतर आर्थिक मालमत्ता, अर्थ पुरवठा करणारे स्रोत जराही विलंब न करता गोठवण्याची मागणी सर्व देशांकडे केली आहे.

हमजा याने २०१५पासून अल कायदाच्या अनुयायांना अमेरिका, पाश्चात्य देश आणि त्यांचे मित्रदेश यांच्यावर हल्ले करण्याची चिथावणी देणाऱया ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स इंटरनेटवर टाकल्या आहेत. त्यांना संयुक्त राष्ट्रांना २०११मध्ये करण्यात आलेल्या वडील ओसामा यांच्या हत्येचा सूड घेण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

जानेवारी २०१७मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हमजा याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याची सर्व मालमत्ता अमेरिकेने गोठवल्या होत्या. तसेच, त्याच्याशी व्यवहार करण्यावरही प्रतिबंध केला होता.

Intro:Body:

un security council black listed hamza bin laden al qaida

'अल कायदाच्या अल जवाहिरी याने सौदी अरेबियात जन्म झाले हमजा बिन लादेन हा अल कायदाचा अकृत सदस्य असल्याचे म्हटले होते. हमजा याने अल कायदाच्या अनुयानांना अधिकाधिक दहशतवादी हल्ले घडवण्याचा आदेश दिला आहे,' असे सुरक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ही शिक्षा सुनावणाऱ्या समितीने नामित केलेल्या सर्व संस्था, गट आणि व्यक्तींचे सर्व पैसा, इतर आर्थिक मालमत्ता, अर्थ पुरवठा करणारे स्रोत जराही विलंब न करता गोठवण्याची मागणी सर्व देशांकडे केली आहे.

हमजा याने २०१५पासून अल कायदाच्या अनुयायांना अमेरिका, पाश्चात्य देश आणि त्यांचे मित्रदेश यांच्यावर हल्ले करण्याची चिथावणी देणाऱया ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स इंटरनेटवर टाकल्या आहेत. त्यांना संयुक्त राष्ट्रांना २०११मध्ये करण्यात आलेल्या वडील ओसामा यांच्या हत्येचा सूड घेण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

जानेवारी २०१७मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हमजा याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याची सर्व मालमत्ता अमेरिकेने गोठवल्या होत्या. तसेच, त्याच्याशी व्यवहार करण्यावरही प्रतिबंध केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.