ETV Bharat / international

ब्रिटनने अफगाणिस्तानातून चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

author img

By

Published : Aug 22, 2021, 7:16 PM IST

ब्रिटनने अफगाणिस्तानातून चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले
ब्रिटनने अफगाणिस्तानातून चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

13 ऑगस्टपासून ते आतापर्यंत अफगाणिस्तानातून सुमारे चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याविषयी अधिकची माहिती दिलेली नसली तरी या चार हजार नागरिकांमध्ये बहुतांश अफगाणी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

लंडन : 13 ऑगस्टपासून ते आतापर्यंत अफगाणिस्तानातून सुमारे चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याविषयी अधिकची माहिती दिलेली नसली तरी या चार हजार नागरिकांमध्ये बहुतांश अफगाणी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

अफगाणी मित्रांचा समावेश

गेल्या 20 वर्षांपासून ब्रिटनला मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांचा यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटिश सैन्यदलाने अफगाणिस्तानातून बाहेर काढलेल्या चार हजार नागरिकांशिवाय अजून पाच हजार अफगाण मित्र बाहेर निघण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. यात भाषांतरकार, चालक अशा व्यक्तींचा समावेश आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या माहितीनुसार ब्रिटनने गेल्या बुधवारपर्यंत दोन हजार अफगाणी आणि 300 ब्रिटिश नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले होते.

काबूल विमानतळावर सैन्यदल तैनात

ब्रिटिश नागरिक आणि अफगाण नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सशस्त्र सैन्यदल अथकपणे काबूल विमानतळावर कार्यरत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवरून सांगितले आहे.

हेही वाचा - अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय मूर्खपणाचा, टोनी ब्लेअर यांची परखड टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.