ETV Bharat / international

अफगाणिस्तानमधील अभेद्य 'पंजशीर प्रांत'; येथे पायही नाही ठेवू शकला तालिबान

author img

By

Published : Aug 23, 2021, 7:44 AM IST

अफगाणिस्तानमध्ये असा एक भाग ज्यावर तालिबान अद्यापही ताबा मिळवू शकला नाही. पंजशीर प्रांत सध्या अभेद्य आहे. पंजशीर तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभा आहे.

Panjshir Province
अफगाणिस्तानमधील अभेद्य 'पंजशीर घाटी'; येथे पायही नाही ठेवू शकला तालिबान

काबूल - अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हाती गेली असून तेथील परिस्थिती अत्यंत चिघळली आहे. मात्र, अफगाणिस्तानमध्ये असा एक भाग ज्यावर तालिबान अद्यापही ताबा मिळवू शकली नाही. पंजशीर प्रांत अभेद्य आहे. पंजशीर तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभा आहे. पंजशीर प्रांताची नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानमध्ये लढाई सुरू झाली आहे. या क्षेत्रात तालिबान पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अहमद शाह मसूद यांच्या नॉर्दर्न अलायन्स यौध्यांनी त्यांनी रोखलं आहे.

अहमद मसूद यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधी सर्व गट अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून पंजशीर घाटीत एकत्र जमले आहेत. पंजशीरमधील योद्धा म्हणून ओळखले जाणारे, अहमद शाह मसूद यांचे 32 वर्षीय पुत्र अहमद मसूद यांनी तालिबानच्या हाती आपला प्रदेश जाऊ देणार नसल्याचे म्हटलं आहे. पंजशीर युद्ध करणार नाही. मात्र, कोणतेही आक्रमण झाल्यास त्याचा विरोध करेल, तालिबानसोबत चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला, तर युद्ध टाळता येऊ शकते, असे अहमद मसूद यांनी म्हटल्याचे वृत्त सअफगाणिस्तानमधील एका अल अरबिया टिव्हीने दाखवले होते.

यापूर्वी अल जजीरा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबानशी हातमिळवणी केल्याचे म्हटलं होते. अहमद शाह मसूद नॉर्दर्न अलायन्स बनल्यानंतर तालिबानला टक्कर देत आले आहेत. त्यांनी कधीच पंजशीर तालिबान्यांच्या हातात जाऊ दिले नाही.

काय आहे नॉर्दर्न अलायन्स?

नॉर्दर्न अलायन्स ही 1996 पासून काबूलमध्ये तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या बंडखोर गटांची युती होती. 1996 मध्ये काबूलवर तालिबान कट्टरपंथी गटाने ताबा मिळवल्यानंतर त्यांचा विरोध करण्यासाठी तयार करण्यात आला होता. याची स्थापना अफगाणिस्तान सरकारचे अध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी आणि माजी संरक्षण मंत्री अहमद शाह मसूद यांनी केली होती. अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद सध्या तालिबानविरोधात उभा ठाकला आहे.

कुठे आहे पंजशीर घाटी?

हिंदु कुश पर्वतांमध्ये काबूलच्या उत्तरेस पंजशीर घाटी आहे. या घाटीत जवळपास 1.5 लाखांहून अधिक लोक राहतात. ताजिक वंशाचे बहुतेक लोक या खोऱ्यात राहतात. प्रतिकाराचे केंद्र म्हणून पंजशीर घाटी ओळखली जाते. सोव्हिएत युनियन, अमेरिका, तालिबान यांना कधीच पंजशीर घाटीवर ताबा मिळवता आलेला नाही. अहमद मसूद, अमरुल्ला सालेह, मोहम्मद खान पंजशीर घाटीतील सर्वात मोठे नेते आहेत. पंजशीर घाटीची राजधानी बाजारक हे शहर आहे. 'पंजशीर' चा अर्थ 'पाच सिंह' असा आहे. 10 व्या गझनीचा सुलतान महमूदसाठी पाच भावांनी धरण बांधले होते. पाच भावांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे

हेही वाचा - मला माहित नाही चांगला माणूस कोण वाईट माणूस कोण, अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा यांना रडू कोसळले

हेही वाचा - अफगाणिस्तानबाबत काय होती पंडीत नेहरुंची भूमिका, वाचा...

हेही वाचा - तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : आतापर्यंत 400 नागरिकांना भारतात सुरक्षित आणलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.