ETV Bharat / international

‘पर्सन ऑफ द इयर 2020 ’ पुरस्कारासाठी जो बिडेन आणि कमला ह‌ॅरीसची निवड

author img

By

Published : Dec 11, 2020, 1:43 PM IST

पर्सन ऑफ द इयर
पर्सन ऑफ द इयर

प्रतिष्ठित ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर 2020’ पुरस्कारासाठी जो बायडेन आणि कमला ह‌ॅरिस यांची निवड केली आहे. टाइम मॅगझीनच्या कव्हर पेजवर बायडेन आणि कमला ह‌ॅरिस यांचा फोटो प्रकाशित झाला आहे.

वॉशिंग्टन डी. सी - प्रतिष्ठित ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर 2020’ पुरस्कारासाठी अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला ह‌ॅरिस यांची निवड केली आहे. जो बायडेन आणि कमला ह‌ॅरिसने अमेरिकेचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विभाजनापेक्षा सहानुभूतीमध्ये जास्त शक्ती असल्याचे दर्शवलं. तसेच त्यांनी जगाला आशेचा किरण दाखवला, त्यामुळे दोघांची ‘पर्सन ऑफ द इयर 2020’ पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे, असं टाइम मॅगझीनचे संपादक एडवर्ड फेलसेंथल यांनी म्हटलं.

टाइम मॅगझीनच्या कव्हर पेजवर बायडेन आणि कमला ह‌ॅरिस यांचा फोटो प्रकाशित झाला आहे. अमेरिकेची बदलती कहानी, असे शिर्षक या फोटोला दिले आहे.

टाइम मॅगझीनची 1927 पासून पुरस्कार देण्याची पंरपरा आहे. सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोग्गी यांना टाइम मॅगझीनचा 2018 चा पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला होता. तर 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची टाइम मासिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर २०१६' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

2019 चा पुरस्कार ग्रेटा थनबर्गला -

पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर 2019’ पुरस्काराने सन्मानित केले होते. ग्रेटाला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला होता.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक -

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 290 इलेक्ट्रोल व्होट्स त्यांना मिळाली. त्यामुळे बायडेन यांच्या 'रनिंग मेट' म्हणजेच उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस याचाही विजय झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रध्यक्षपदाचा उमेदवाराचा तब्बल 74 दशलक्ष मतांनी विजयी झाला आहे. तसेच पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिला उपराष्ट्रध्यपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे 2020 ची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक झाली आहे.

हेही वाचा - रेल्वे रुळांवर कब्जा करू, शेतकरी आंदोलकांचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.