ETV Bharat / international

अफगाणिस्तानला संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा; सहकार्य करत राहणार, मार्टिन ग्रिफिथ्स यांचे टि्वट

author img

By

Published : Sep 6, 2021, 1:03 PM IST

UN reaffirms to deliver humanitarian assistance to Afghanistan
अफगाणिस्तानला संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा; सहकार्य करत राहणार, मार्टिन ग्रिफिथ्स यांचे टि्वट

अफगाण अर्थव्यवस्था ढासळत असून त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. इतर देशांकडून अफगाणिस्तानला मदत मिळण्याची शक्यता क्षीण आहे. अशा अवस्थेत तालिबानसमोर मोठे आव्हान आहे. तालिबानी नेता मुल्ला बरादर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या मानवी मुल्यांसंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे अवर महासचिव मार्टिन ग्रिफिथ्स यांची भेट घेतली. या भेटीनंतर संयुक्त राष्ट्राचे सूर बदलले पाहायला मिळाले.

काबूल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर देशात अस्थिरता पसरली आहे. अफगाणिस्तानमध्ये अन्न-धान्य महाग झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंचा किंमती गगनाला भिडल्या आहेत. अफगाण अर्थव्यवस्था ढासळत असून त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. इतर देशांकडून अफगाणिस्तानला मदत मिळण्याची शक्यता क्षीण आहे. अशा अवस्थेत तालिबानसमोर मोठे आव्हान आहे. तालिबानी नेता मुल्ला बरादर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या मानवी मुल्यांसंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे अवर महासचिव मार्टिन ग्रिफिथ्स यांची भेट घेतली. या भेटीनंतर संयुक्त राष्ट्राचे सूर बदलले पाहायला मिळाले.

मार्टिन ग्रिफिथ्स यांनी टि्वट करून अफगाणिस्तनाला समर्थन आणि निष्पक्ष मानवीय मदत करत राहणार असल्याचे सांगितले. गरजू लोकांना मदत आणि सुरक्षा पुरवण्यासाठी संयुक्त राष्ट्र बांधील असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी सर्वांना महिला आणि अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. ग्रिफिथ्स यांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांप्रती एकजुटता व्‍यक्‍त केली. येत्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा तालिबान आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.

याआधी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 13 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानसाठी उच्चस्तरीय मानवतावादी परिषद बोलावली आहे. गुटेरेस यांनी अफगाणिस्तानमधील मानवतावादी , आर्थिक संकटाबद्दल आणि मूलभूत सेवा पूर्णपणे कोलमडण्याच्या धोक्याबद्दल आपली चिंता व्यक्त केली होती.

अफगाणिस्तानातील सामान्य लोकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. देशात उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाण लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी घरातील वस्तू विकाव्या लागत आहेत. सध्या, अफगाणिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय चलनाचे मूल्य घसरत असून ही देखील चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.

तालिबान सरकारची घोषणा लवकरच -

तालिबानने शनिवारी काबूलमध्ये नवीन सरकार स्थापन करत असल्याची घोषणा करण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. सरकार स्थापन करण्यास आणखी काही काळ लागेल. मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादा हे देशाचे सर्वोच्च नेता होऊ शकतात. पंतप्रधानपदी अब्दुल गनी बरादर किंवा मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूबची निवड होऊ शकते.मुल्‍ला अखुंदजादा हे एक रहस्यमय व्यक्ती असून त्यांना अनेक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले नाही. 60 वर्षीय मुल्ला हे तालिबान सरकारचे सर्वोच्च नेता होणार आहेत. तालिबान इराण मॉडेलनुसार सरकार स्थापन करणार आहे. अफगाणिस्तानात सत्ता मिळवली असली तरी तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे.

हेही वाचा - युद्ध थांबवण्यासाठी अहमद मसूद यांचे तालिबानला चर्चेसाठी आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.