ETV Bharat / international

कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, कोरोना नियंत्रणात असल्याने पाकिस्तानचा निर्णय

author img

By

Published : Oct 3, 2020, 3:58 PM IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मार्चमध्ये कर्तारपूर कॉरिडोर बंद केला होता. पाकिस्तान सरकारनेही पाकिस्तानी नागरिकांना कर्तारपूर कॉरिडोरमधून प्रवास करण्यास बंदी घातली होती.

गुरुद्वारा कर्तारपूर साहीब कॉरिडोर
गुरुद्वारा कर्तारपूर साहीब कॉरिडोर

इस्लामाबाद - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने गुरुद्वारा कर्तारपूर साहीब कॉरिडोर पुन्हा उघडण्यात येणार असल्याची पाकिस्तान सरकारने घोषणा केली आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या धार्मिक कार्य मंत्रालयाने नवी अधिसूचना जाहीर केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार भारतीय पर्यटकांना पहाटेपासून संध्याकाळपर्यंत दररोज येथे येण्याची परवानगी आहे.

कर्तारपूर साहीब कॉरिडोरचा 7 किलोमीटर लांबीचा रस्ता जो भारताच्या गुरुदासपुरातील डेरा बाबा नानक साहीब आणि पाकिस्तानच्या कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहीबला जोडतो. 2019 मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मार्चमध्ये कर्तारपूर कॉरिडोर बंद केला होता. पाकिस्तान सरकारनेही पाकिस्तानी नागरिकांना कर्तारपूर कॉरिडोरमधून प्रवास करण्यास बंदी घातली होती.

हेही वाचा - सफर... जगातील सर्वात जास्त लांबीच्या अटल बोगद्याची!

जून महिन्यात महाराजा रणजितसिंग यांच्या स्मृतीदिनानिमित्त पाकिस्तानने गुरुद्वारा पुन्हा उघडण्याचे नियोजन केले होते. त्यांच्याकडून यासाठी भारताला प्रस्तावही पाठवण्यात आला होता. मात्र, भारतातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने प्रस्ताव फेटाळून लावला होता.

हेही वाचा - भारतात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला 1 लाखाचा टप्पा; बाधितांचा आकडा 64 लाखांवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.