बांगलादेशात हिंदूवर हल्ले; सत्ताधारी पक्षाने हिंदूंच्या समर्थनार्थ काढली रॅली

author img

By

Published : Oct 20, 2021, 2:12 PM IST

Bangladesh Pm

गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम बहुल बांगलादेशामध्ये जातीय हिंसाचारात अनेक हिंदू ठार झाले आहेत आणि हिंदू घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत 450 लोकांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान शेख हसीना या अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या हल्ल्यामुळे नाराज असून त्यांनी गृहमंत्र्यांना हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ढाका - बांगलादेशात मोठा जातीय हिंसाचार उफाळला असून हिंदू मंदिर, घरांवर हल्ले होत आहेत. यावर सत्ताधारी पक्ष अवामी लीगने अल्पसंख्याक हिंदूंच्या समर्थनार्थ एक रॅली काढली आहे. "सांप्रदायिक हिंसा थांबवा" असा नारा देत हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम बहुल बांगलादेशामध्ये जातीय हिंसाचारात अनेक हिंदू ठार झाले आहेत आणि हिंदू घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत 450 लोकांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंतप्रधान शेख हसीना या अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या हल्ल्यामुळे नाराज असून त्यांनी गृहमंत्र्यांना हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तथ्य जाणून घेतल्याशिवाय सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पंतप्रधान शेख हसीना यांनी नागरिकांना केले आहे. पोलिसांनी दंगलीप्रकरणी विविध ठिकाणी 71 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुस्लीम समाजातील शेकडो लोकांनी हिंदूंवर कुराणशी संबंधित निंदनीय कृत्य केल्याचा आरोप केला होता. यानंतर हा वाद हिंसाचारात बदलला. मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अनेक घरांवर आणि पवित्र स्थळांवर हल्ला करून तोडफोड करण्यात आला. ऐन ओ सालिश केंद्र या बांगलादेश स्थित संस्थेच्या मते, जानेवारी 2013 ते सप्टेंबर 2021 दरम्यान हिंदूंवर 3,679 हल्ले झाले आहेत.

हिंसाचार थांबवण्याचे संयुक्त राष्ट्राचे आवाहन -

धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा देत संयुक्त राष्ट्र संघानेही हिंसाचार थांबवण्यास सांगितले आहे. बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेले हल्ले हे संविधानाच्या मूल्यांविरोधात आहेत आणि ते थांबले पाहिजेत, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीने म्हटलं. बांगलादेशच्या 170 दशलक्ष लोकसंख्येपैकी 10 टक्के हिंदू आहेत.

हेही वाचा - बांगलादेशच्या 'त्या' वैमानिकाचा नागपुरात मृत्यू; विमानाचं केलं होतं इमर्जन्सी लँडिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.