ETV Bharat / international

'अभिनंदन'ला सोडा नाहीतर भारत हल्ला करेल, पाक लष्करप्रमुख तेंव्हा थरथर कापत होते '

author img

By

Published : Oct 29, 2020, 8:13 AM IST

Updated : Oct 29, 2020, 11:29 AM IST

abhinandan Vardhman, Wing Commander, Indian Air Force
भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान

भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडा. नाहीतर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, असे पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी विरोधकांना सांगितले होते. असा दावा पाकीस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी केला आहे.

इस्लामाबाद- भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानने मुक्त केले होते. मात्र, अजूनही त्यांच्या नावावर राजकारण सुरूच आहे. 'अभिनंदनला सोडणे आवश्यक आहे, नाहीतर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल',असे पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले होते. त्यावेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांचे पाय थरथर कापत होते असा गौप्यस्फोट पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांनी केला आहे.

इम्रान खान बैठकीला आले नव्हते

संसदेतील भाषणात अयाज यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, 'अभिनंदनबद्दल तुम्ही काय बोलता, शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख त्या बैठकीत होते. त्यावेळी कुरेशी म्हणाले होते की अभिनंदनला परत जाऊ द्या, खुदा का वास्ता अभिनंदनला जाऊ द्या, रात्री 9 वाजता भारत हल्ला करणार आहे. आणि इमरान खान यांनी त्या बैठकीस येण्यास नकार दिला होता.'

हेही वाचा-मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्मेनियन पंतप्रधानांच्या पत्नी जाणार सीमेवर!

पाय थरथर कापत होते

भारत कोणताही हल्ला करणार नव्हते. पण पाकिस्तान सरकारला फक्त गुडघे टेकून अभिनंदन यांना पाठवायचे होते आणि ते झाले. त्या बैठकीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांचे पाय थरथर कापत होते आणि अभिनंदन यांना सोडले नाही तर भारत रात्री नऊ वाजता हल्ला करेल, असे सांगून ते सर्वांना घाबरत होते. प्रत्यक्षात असे काहीही होणार नव्हते, असे अयाज म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गेल्यावर्षी अभिनंदन यांच्या विमानाचा अपघात झाला आणि ते पाकिस्तानच्या तावडीत सापडले. तेथून त्यांना पाक सैनिकांनी पकडले. पाक सैनिकांकडून अभिनंदनचे मानसिकरीत्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांला यश मिळू शकले नाही. अखेरीस 1 मार्च रोजी पाकिस्तानला अभिनंदनला अटारी-वाघा सीमेवरून भारतात पाठवावे लागले.

हेही वाचा-काही शक्तींचा पाकिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न : कुरेशी

Last Updated :Oct 29, 2020, 11:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.