ETV Bharat / international

श्यामला गोपालन ते कमला हॅरिस यांचा अमेरिकेतील थक्क करणारा प्रवास

author img

By

Published : Jan 20, 2021, 5:29 PM IST

Updated : Jan 20, 2021, 7:42 PM IST

भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. या शिवाय या पदासाठी निवड झालेल्या त्या पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीही त्या ठरणार आहेत. जाणून घेऊया त्यांची आई श्यामला गोपालन व कमला हॅरिस यांचा आतापर्यंतचा थक्क करणारा प्रवास...

श्यामला, कमला व माया हॅरिस
श्यामला, कमला व माया हॅरिस

न्यूयार्क - भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. या शिवाय या पदासाठी निवड झालेल्या त्या पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीही त्या ठरणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विविध नियुक्त्यांविषयी हॅरीस यांनी ठामपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

19 व्या वर्षीच अमेरिकेत आल्या होत्या हॅरीस यांच्या आई श्यामला

हॅरीस यांच्या आई श्यामला गोपालन भारतीय तर वडील डोनाल्ड हॅरीस जमैकाचे आहेत. हॅरीस यांच्या आई वयाच्या 19 व्या वर्षी सन 1958मध्ये अमेरिकेच्या बर्कली येथे आल्या होत्या. येथेच त्यांची भेट डोनाल्ड हॅरीस यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी विवाह केला. यातून त्यांना कमला आणि माया या दोन मुली झाल्या.

असा आहे श्यामला गोपालन व कमला हॅरीस यांचा प्रवास

  • 1958 - कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात शिकण्यासाठी श्यामला गोपालन यांनी हिलगार्ड शिष्यवृत्ती जिंकली.
  • 1960 - श्यामला गोपालन यांनी कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
  • 1962 - अ‌ॅफ्रो-अमेरिकन असोसिएशनच्या बैठकीत श्यामला गोपालन यांची डोनाल्ड हॅरिस यांच्याशी भेटी झाली.
  • 5 जुलै, 1963 - श्यामला गोपालन व डोनाल्ड हॅरिस विवाह बंधनात अडकले.
  • 1964 - श्यामला गोपलन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची पी.एचडी. पदवी मिळवली.
  • 20 ऑक्टोबर, 1964 - श्‍यामला यांनी कॅलिफोर्नियाच्या ओकलँड येथील कैसर फाउंडेशन रुग्मालयात कमला हॅरिस यांना जन्म दिला.
  • 1966 - डोनाल्ड हॅरिस यांनी इलिनॉय विद्यापीठातून अर्थशास्त्राचे विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली.
  • 30 जानेवारी, 1967 - श्‍यामला यांनी दूसरी मलगी व कमला यांची बहिण माया यांस जन्म दिला.
  • 1971 - श्यामला व त्यांचे पती डोनाल्ड हॅरिस यांचा घटस्फोट झाला.
  • 1976 - श्यामला हे आपल्या दोन्ही मुलींसह कॅनडा येथे गेल्या. तिने मॅकगिल विद्यापीठात अध्यापन आणि ज्यूज जनरल रुग्णालयात संशोधन करण्यास सुरुवात केली.
  • 1981 - कमला हॅरिस यांनी मॉन्ट्रियलच्या वेस्टमाउंट हायस्कूलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
  • 1986 - कमला हॅरिस यांनी हॉवर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
  • 1989 - कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या हॅसिंगटन महाविद्यालयातून विधी (कायदे)चे शिक्षण पूर्ण केले.
  • 1990 - कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या ओकलँड येथील न्यायालयात 8 वर्षे उप जिल्हा वकील म्हणून काम केले.
  • 11 फेब्रूवारी 2009 - वयाच्या 70 व्या वर्षी श्यामला यांचे निधन झाले.
  • 2010 - कमला यांची कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल पदी नियुक्ती झाली. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या भारतील वंशाच्या महिला होत्या.
  • 2012 - डेमोक्रेटिक नॅशनल कनव्हेंशनमध्ये पहल्यांदाच कमला यांनी भाषण केले.
  • 2016 - सीनेट निवडणुकीत लॉरेटा सॅन्शेज यांचा पराभव करत कमला अमेरिकन सीनेटवर निवडून जाणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन व्यक्ती ठरल्या.
  • 8 जानेवारी, 2019 - त्यांचे पहले पुस्‍तक 'द ट्रूथ वी होल्‍ड, अ‌ॅन अमेरिकन जर्नी' प्रकाशित झाले.
  • 21 जानेवारी, 2019 - कमला हॅरिस यांनी 'गूड मॉर्निंग अमेरिका' या मोहिमेतून अध्यक्षपदासाठीची तयारी सुरू केली.
  • 3 डिसेंबर, 2019 - निधीच्या कमतरतेमुळे कमला यांनी अध्यक्षपदासाठीचा प्रचार थांबवला.
  • 1 ऑगस्‍ट, 2020 - जो बाइडेन यांनी कमला हॅरिस यांच्या नावाची उप-राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषणा केली.
Last Updated : Jan 20, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.