ETV Bharat / international

'द क्रू ड्रॅगन' अंतराळयान यशस्वी पोहोचले अंतराळ स्थानकात

author img

By

Published : Jun 1, 2020, 9:11 AM IST

स्पेसएक्स ड्रॅगन यान हे केवळ 19 तासांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहे.

nasa photo
अंतराळात पोहोचताना यान

केप कॅनावेरल - अमेरिकेतील अंतराळ क्षेत्रातील खासगी स्पेसएक्स या कंपनीचे ड्रॅगन हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS - इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) सुरक्षित पोहोचले आहे. दोन अंतराळवीर यातून अंतराळ स्थानकावर पोहोचले असून बॉब बेहनकेन आणि डग हर्ले, असे त्या अंतराळवीरांचे नाव आहे.

स्पेसएक्स ड्रॅगन यान कोणत्याही मदतीशिवाय स्वयंचलितपणे स्थानकाशी जोडले गेले. खासगी क्षेत्रातील अंतराळयान निर्मित करणाऱ्या कंपनीने 20 वर्षांनी प्रथमच हे काम केले आहे.

नासानेदेखील या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळावर जाण्याची शक्यता दृष्टीक्षेपात येत असल्याचे म्हटले आहे. कॅनेडी स्पेस स्टेशनवरून फाल्कन 9 रॉकेटने ड्रॅगन यानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर 19 तासांतच यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहे. अंतराळवीरांचा एक व्हिडिओही नासाने आपल्या अधिकृत टि्वटरवरून प्रसारित केले आहे.

हेही वाचा - जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आगडोंब, वाचा संपूर्ण प्रकरण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.