वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. जो बायडेन यांनी चर्चेदरम्यान महात्मा गांधी यांच्या जयंतीचा उल्लेख केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की गांधींजी हे विश्वासर्हतेबाबत बोलले होते. ही संकल्पना सध्याच्या काळात आपल्या पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी द्विपक्षीय चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की अध्यक्ष बायडेन यांनी उल्लेख केलेला प्रत्येक विषय हा भारत-अमेरिकेच्या मैत्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोना, हवामान बदलाचा प्रभाव कमी करणे आणि क्वाडबाबत त्यांचे काम उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
-
#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from US President Joe Biden at the White House pic.twitter.com/SEp29Rrl5g
— ANI (@ANI) September 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from US President Joe Biden at the White House pic.twitter.com/SEp29Rrl5g
— ANI (@ANI) September 24, 2021#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from US President Joe Biden at the White House pic.twitter.com/SEp29Rrl5g
— ANI (@ANI) September 24, 2021
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार
व्हाऊट हाऊसमधील राजशिष्टाचार प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेस्ट विंग डोअरवर स्वागत केले. मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात तासाभराची भेट झाली आहे. ही भेट ओव्हल कार्यालयात झाली.
पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यावर भारत-अमेरिका संबंधावर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने, दोन्ही देशांचे सहकार्यातून व्यापार वाढवणे, सुरक्षा, सरकार्य यावर चर्चा करण्यात आली आहे. 25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते दहशतवाद, कोरोना आणि हवामान बदलावर जागतिक उपाय यावर बोलणार आहेत.
अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्याच्या भारताच्या प्रयत्नाबद्दल परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा कशी होऊ शकते, हे पंतप्रधान आपल्या अभिभाषणात नमूद करतील. त्यामध्ये त्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे. दरम्यान, भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील, अशी माहितीही श्रृंगला यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी 25 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करतील. तसेच, या अधिवेशनात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन जागतिक नेत्यांनाही संबोधित करतील. अशी माहिती संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सोमवारी दिली आहे.
हेही वाचा-पीएम केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही; पंतप्रधान कार्यालयाची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती
दरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना खास भेट दिली आहे. कमला हॅरिस यांचे आजोबा हे केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. त्यांची पत्रे ही कमला हॅरिस यांना हस्तशिल्पाच्या फ्रेममध्ये भेट म्हणून देण्यात आली आहेत. सोबतच गुलाबी मीनाकारी बुद्धीबळ सेटही देण्यात आला आहे.
हेही वाचा-भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींनी या' दिल्या खास भेटवस्तू