Columbia Landslide : कोलंबियातील भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू तर 35 जखमी

author img

By

Published : Feb 9, 2022, 2:27 PM IST

Columbia Landslide

पश्चिम कोलंबियातील (western colombia) एका शहरातील निवासी भागात मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन (colombia landslide) होऊन 14 जणांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले.

बोगोटा - पश्चिम कोलंबियातील (western colombia) एका शहरातील निवासी भागात मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन (colombia landslide) होऊन 14 जणांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले. परेरा नगरपालिकेच्या रिसारल्डा येथे भीषण भूस्खलनानंतर एक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

परेरा शहराचे महापौर कार्लोस माया यांनी सांगितले की, भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. परिसरात दरड कोसळण्याचा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला. अधिक जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांनी लोकांना जागा रिकामी करण्याचे आवाहन केले. भूस्खलनामुळे लाकडाच्या घरांचे नुकसान झाले होते. बचाव पथकांनी 60 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे

हेही वाचा - Israel Police Used Spyware : माजी पंतप्रधान नेत्यानाहूंच्या मुलावर नजर ठेवण्यासाठी स्पायवेयरचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.