ETV Bharat / international

Ashish Jha Covid 19 Response Coordinator : भारतीय वंशाच्या आशिष झा यांना व्हाईट हाऊसमध्ये मोठी जबाबदारी

author img

By

Published : Mar 17, 2022, 10:35 PM IST

Ashish Jha
Ashish Jha

राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्या कोरोना समन्वयक पदी भारतीय वंशाच्या डॉ. आशिष झा यांची नियुक्ती करण्यात आली ( Ashish Jha Covid Response Coordinator ) आहे. याबाबत गुरुवारी व्हाईट हाऊसने घोषणा केली ( White House Announced Ashish Jha Name ) आहे.

वॉशिंग्टन - राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्या कोरोना समन्वयक पदी भारतीय वंशाच्या डॉ. आशिष झा यांची नियुक्ती करण्यात आली ( Ashish Jha Covid Response Coordinator ) आहे. याबाबत गुरुवारी व्हाईट हाऊसने घोषणा केली ( White House Announced Ashish Jha Name ) आहे. झा हे ब्राउन विद्यापीठ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक आहेत.

बिहारमध्ये जन्मलेल्या 51 वर्षीय डॉ. आशिष झा यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे व्यवस्थापन आणि माजी आर्थिक सल्लागार जेफ झिएंट्स यांची जागा घेतली आहे. झा यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं की, आम्ही साथीच्या रोगाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. कोरोना बाबत माझ्या योजना आणि व्यवस्थान राबवण्यासाठी डॉ. झा हे योग्य व्यक्ती आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे नेतृत्व अमेरिकेकडून केले जात आहे. अमेरिकेने अन्य देशांपेक्षा जास्त मोफत लस पुरवल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, जेफने कोरोना सामना करण्याच्या दृष्टीने 14 महिने अथक परिश्रम घेतले, असेही राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे.

नियुक्ती झाल्यानंतर डॉ. आशिष झा म्हणाले की, अमेरिकेतील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अजून काम करायचे आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मला सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मला अभिमान वाटत आहे, असे झा यांनी म्हटलं.

हेही वाचा - Indian Judge Against Russia In ICJ : आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय न्यायाधीशाने केले रशियाच्या विरोधात मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.