ETV Bharat / entertainment

Mi Nathuram Godse Boltoy drama dispute : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चा वाद न्यायालयात, नव्या नावासह नाटक सादर करणार शरद पोंक्षे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 6:56 PM IST

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे निर्माते व माऊली प्रॉडक्शनचे मालक उदय धुरत यांनी अभिनेता शरद पोंक्षेंविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. पोंक्षे यांनी मूळ नाटकाची नक्कल करुन रंगभूमीवर नवं नाटक आणल्याचा दावा निर्मात्यांनी केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला नाव बदलाच्याअर्जावर विचार करण्यासाठी निर्देश दिले आहेत.

Mi Nathuram Godse Boltoy drama dispute
मी नथुराम गोडसे बोलतोय

मुंबई - ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक प्रदीप दळवी लिखीत नाटक 90 च्या दशकापासून अनेक कारणांनी चर्चेत राहिलंय. गेल्या अनेक वर्षापासून या नाटकात शरद पोंक्षे नथूराम गोडसे ही व्यक्तीरेखा साकारत आहेत. महात्मा गांधी खटल्यात आरोपी ठरलेल्या नथूराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा आरोप नाटकावर आणि शरद पोंक्षेवर नेहमी होत आलाय. या नाटकाची निर्मिती माऊली प्रॉडक्शन या नाट्य संस्थेनं केलीय. रंगमंचावर या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती असली तरी सुरक्षेची काळजीही प्रशासनाला नेहमी घ्यावी लागते. दरम्यान माऊली प्रॉडक्शनपासून फारकत घेत शरद पोंक्षे यांनी हे नाटकं नव्या रुपात रंगमंचावर आणलं आहे. याला माऊली प्रॉडक्शनचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठांसमोर याबाबत याचिका दाखल केली होती.



शरद पोंक्षे यांनी मूळ नाटकाची नक्कल करुन रंगभूमीवर नवं नाटक आणल्याचा दावा याचिकेमध्ये निर्मात्यांनी केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला नाव बदलाच्या अर्जावर विचार करण्यासाठी निर्देश दिले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शरद पोक्षे आता 'नथुराम गोडसे बोलतोय'ऐवजी 'नथुराम गोडसे' असा नाटकाच्या नावात बदल करणार आहेत.


माऊली प्रोडक्शन द्वारे 1998 साली पहिल्यांदा 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्र राज्यात केले होते. त्यावेळी ठिक ठिकाणी या नाटकाला विरोध देखील झाला होता. 2016 ते 2019 सलग चार वर्षे शरद पोक्षे यांनी 'हे राम नथुराम'या नाटकाचे प्रयोग केले होते. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात हे प्रयोग झाले होते. काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन मिळाले होते. 15 ऑगस्ट 2023 रोजी अभिनेता शरद पोंक्षे यांनी सार्वजनिकपणे घोषित केले की, पुन्हा ते नाटक महाराष्ट्रातील विविध शहरातील नाट्यगृहात करणार आहे. तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की 'हे राम' ऐवजी 'मी नथुराम गोडसे बोलतोय या नावानं ते नाटक सादर करतील.



त्या नंतर निर्माता उदय धुरत यांना ही सर्व बाब समजली. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि शरद पोंक्षे यांनी तेच नाव वापरण्याला आक्षेप घेतला आहे. खरे पाहता 'मी नथुरामगोडसे बोलतोय हे नाटक उदय धुरत या निर्मात्याच्या नावावर नोंदणी आहे. त्यामुळे त्यांच्या शिवाय दुसरे कोणी त्या किंवा त्या सारख्या नावाने नाटक सादर करू शकत नाही.



याबाबतीत न्यायालयाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर यासंदर्भात निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोंक्षेंच्या नव्या नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्याचा तपशील कोर्टात सादर करावा लागणार आहे. तसेच मूळ मालकाच्या आक्षेपानंतर शरद पोंक्षे नाटकाचे नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती शरद पोंक्षे यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नव्या नावासाठी सेन्सॉर बोर्डाकडे दोन दिवसांत अर्ज करण्यास मुभा दिली आहे.काॅपीराईटच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात पुन्हा २७ ऑक्टोबरला घेणार सुनावणी घेणार आहे.

हेही वाचा -

  1. Leo Movie : थलपथी विजयच्या 'लिओ'चं वाजत गाजत स्वागत; थिएटर बाहेरचा व्हिडिओ व्हायरल...
  2. LEO Advance Booking : थलपथी विजयच्या 'लिओ'नं वाजला डंका; जागतिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग 200 कोटीच्या जवळपास
  3. Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.