ETV Bharat / entertainment

Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 6:55 PM IST

Mehreen Pirzada :अभिनेत्री मेहरीन पिरजादाची डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या क्राईम थ्रिलर 'सुलतान ऑफ दिल्ली'द्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे. सध्या तिला वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

Mehreen Pirzada
मेहरीन पिरजादा

मुंबई - Mehreen Pirzada : अभिनेत्री मेहरीन पिरजादानं नुकतेच ओटीटीमध्ये पदार्पण केले. डिस्ने हॉटस्टारच्या 'सुलतान ऑफ दिल्ली' या वेबसिरीजमुळे ती चर्चेत आली आहे. या वेब सिरीजला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. वेब सिरीजमधील एक सीन आहे, ज्यामध्ये वैवाहिक बलात्कार दाखवला गेला आहे. मिलन लुथरियनच्या मालिकेबाबत गदारोळ सध्या निर्माण झाला आहे. मेहरीन पिरजादाला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान आता मेहरीन या वादावर मौन सोडले आहे. तिनं आता ओटीटी डेब्यू आणि वेब सीरिजमध्ये केलेल्या 'सेक्स सीन'वर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आता ट्रोल्सच्या शब्दांनाही प्रत्युत्तर दिले आहे.

  • Recently I made my OTT Debut in the web series, “Sultan of Delhi” on Disney Hotstar. I hope my fans have enjoyed watching the series. Sometimes scripts demand certain actions which might go against your own morals. As a professional actor who considers acting an art and at the…

    — Mehreen Pirzada👑 (@Mehreenpirzada) October 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मेहरीन पिरजादा झाली ट्रोल : मेहरीन पिरजादा ट्रोल करणाऱ्या सांगितलं की, 'स्क्रिप्टच्या मागणीमुळे अनेकदा अशा गोष्टी कराव्या लागतात'. वैवाहिक बलात्काराचे सेक्स सीन म्हणून वर्णन केल्यावर मेहरीनला राग आला आहे. मेहरीन पिरजादानं पुढं सांगितलं, 'अलीकडेच मी 'सुल्तान ऑफ दिल्ली' या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना ही मालिका आवडली असेल. कधीकधी तुम्हाला तुमचे नैतिकता बाजूला ठेवून स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित करावे लागते. स्क्रिप्ट सांगते तसे करावे लागते. मी एक अभिनेत्री आहे. माझे काम पूर्ण जबाबदारीने व प्रामाणिकपणे करणे हे माझे कर्तव्य आहे. मी देखील कहाणीचा भाग आहे'.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मेहरीन पिरजादा दिले चोख उत्तर : ती पुढे म्हणते, 'सुलतान ऑफ दिल्ली सिरीजमध्ये वैवाहिक बलात्काराचा सीन आहे. मी या समस्येबद्दल खूप गंभीर आहे. मीडियानं ते सेक्स सीन म्हणून दाखवल्यामुळे मी खूप निराश आहे. वैवाहिक बलात्कार ही एक गंभीर समस्या आहे, ज्याचा परिणाम जगभरातील महिलांवर होत आहे. मेहरीन पिरजादा यांनी ट्रोल्स आणि काही लोकांनी या गंभीर प्रकरणाला सेक्स सीन म्हणून कसे संबोधले यावर नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय तिलाही या गोष्टींमुळे खूप त्रास होतो असं तिनं सांगितलं. पुढे तिनं म्हटलं, त्यांनाही बहिणी आणि मुली आहेत, हे लोकांनी समजून घ्यायला हवे, देव न करो कोणालाही या वेदनातून जावे लागेल. महिलांवरील असा क्रूर आणि हिंसाचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. याबद्दल तिनं नाराजी व्यक्त केली आहे. मेहरीन पिरजादाने 'फिल्लौरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांझ आणि सूरज शर्मा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा :

  1. Tiger 3 Movie : 'टायगर 3'च्या ट्रेलरला मिळत आहे पसंती ; सलमान खान आणि कतरिना कैफनं मानले चाहत्यांचे आभार...
  2. Bigg boss 17 : 'बिग बॉस 17' अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा झाल्या भावूक; नात्यांमध्ये आला दुरावा...
  3. War 2 goes on floor : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2' च्या शुटिंगला सुरुवात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.