ETV Bharat / entertainment

unauthorized streaming of film Brahmastra अनधिकृत स्ट्रीमिंग करणाऱ्या 18 वेबसाइट्सवर उच्च न्यायालयाकडून बंदीचे 'ब्रम्हास्त्र'

author img

By

Published : Sep 5, 2022, 8:07 PM IST

सोमवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने DELHI HIGH COURT ORDER एका याचिकेवर सुनावणी करतांना, ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या UNAUTHORIZED STREAMING OF FILM BRAHMASTRA अनधिकृत स्ट्रीमिंगसाठी 18 वेबसाइट्स ब्लॉक TO BAN 18 WEBSITES करण्याचे आदेश दिले आहेत. स्टार इंडियाने ही याचिका दाखल केली होती

film Brahmastra
ब्रह्मास्त्र चित्रपट

दिल्ली ब्रह्मास्त्र-भाग एक शिवा, या चित्रपटाच्या अनधिकृत प्रसारणासाठी UNAUTHORIZED STREAMING OF FILM BRAHMASTRA दिल्ली उच्च न्यायालयाने DELHI HIGH COURT ORDER 18 वेबसाइट ब्लॉक TO BAN 18 WEBSITES करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, चित्रपटाची पायरसी कोणत्याही परिस्थितीत थांबली पाहिजे. या चित्रपटाची निर्मिती आणि प्रमोशन करणाऱ्या स्टार इंडियाने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, 18 वेबसाइट्स त्यांच्या चित्रपटाचे अनधिकृत प्रसारण करत आहेत, असे करणे हे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आहे.

चित्रपटाचे अनधिकृत प्रक्षेपण थांबवण्यासाठी या 18 संकेतस्थळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित, या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

ब्रह्मास्त्र हा एक पौराणिक-काल्पनिक चित्रपट आहे, ज्याच्या सेटवर आलिया भट्ट आणि रणबीर प्रेमात पडले होते. या दोघांनी वर्षाच्या सुरुवातीला १४ एप्रिल रोजी लग्न केले. रणबीर, आलिया आणि अयान सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ब्रह्मास्त्र भाग एक- शिवा 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा Most Educated Artists : बॉलीवूडचे सर्वात जास्त शिकलेले कलावंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.