ETV Bharat / entertainment

Womens Reservation Bill : महिला किती शक्तिशाली आहेत याची जाणीव त्यांना नसते : आशा भोसले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 12:41 PM IST

Updated : Sep 21, 2023, 1:08 PM IST

Womens Reservation Bill : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी संसदेत महिला आरक्षण विधेयक बुधवारी लोकसभेत पारीत झालं. देशाच्या राजकारणात महिलांना स्वतःचा ठसा उमटवू देण्यासाठी उचललेल्या पावलाबद्दल चित्रपटसृष्टीतल्या सेलेब्रिटींनी समाधान व्यक्त केलं आहे. विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनीही या विधेयकाबाबत आपले विचार व्यक्त केले.

Women's Reservation Bill
महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत

मुंबई - Womens Reservation Bill : लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यासाठी भारत सरकारने मांडलेलं विधेयक लोकसभेत बुधवारी संमत झालं. पक्षांमधील सहमतीच्या अभावामुळे 27 वर्षांपासून निष्क्रिय राहिलेल्या या विधेयकाचं पुनरुज्जीवन झालं. या विधेयकाच्या निमित्तानं अभिनेत्री कंगना रणौत, ईशा गुप्ता आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

  • We are all witnessing beginning of a new age.
    Our time has come.
    This is the time of the girl child (no more female foeticide) this is the time of the young women (no more clinging to men for safety and security), this is the time of the Middle aged women (no you are not unwanted… pic.twitter.com/rzpSE3wBha

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना रणौत आणि ईशा गुप्ता यांना संसदेच्या नवीन इमारतीतील पहिल्या कामकाजाला उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रण मिळालं होतं. कंगनाने या विधेयकावर आपले विचार मांडताना सांगितलं की, ही एक अद्भुत कल्पना आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिलांच्या उन्नतीसाठी सरकारच्या प्रगतशील विचार करत असल्याचं सांगत कृतज्ञता व्यक्त केली. संसदेत उपस्थित असलेल्या ईशा गुप्ता या निमित्तानं म्हणाली की, महिलांना समान अधिकार देणारा हा एक उत्तम आणि अतिशय प्रगतीशील विचार आहे. हे आपल्या देशासाठी उचलेलं एक मोठं पाऊल आहे. पंतप्रधान मोदींनी जे वचन दिले आणि ते पूर्ण केलं.

  • VIDEO | "Women have no idea how powerful they are. For instance, I had a show today and sang for three hours at the age of 90. This is what women power is, and this shows their remarkable resilience," says veteran singer Asha Bhosle on the Women’s Reservation Bill.… pic.twitter.com/HjPCO2C7fD

    — Press Trust of India (@PTI_News) September 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या विधेयकावर आशा भोसले यांनी स्त्रियांना त्या किती शक्तिशाली आहेत याची जाणीव नसते. उदाहरणार्थ, मी आज एक कार्यक्रम केला आणि वयाच्या 90 व्या वर्षी तीन तास गायले. हीच स्त्री-शक्ती आहे, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • #WATCH | On Women's Reservation Bill, actor Kangana Ranaut says, " This is a wonderful idea, this is all because of our honourable PM Modi and this govt and his (PM Modi) thoughtfulness towards the upliftment of women" pic.twitter.com/xrtFZBZkNW

    — ANI (@ANI) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीतून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचे उद्दिष्ट असणार आहे. स्त्री-पुरुष समानता आणि सर्वसमावेशक शासनाच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातंय.

  • #WATCH | Delhi: On the Women's Reservation Bill, Actress Esha Gupta says, "It's a beautiful thing that PM Modi has done. It's a very progressive thought...This Reservation Bill will give equal powers to women...It's a big step for our country. PM Modi promised it and delivered… pic.twitter.com/bqPirQcv4V

    — ANI (@ANI) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिला आरक्षण विधेयकाचा इतिहास - महिला आरक्षण विधेयक यापूर्वी पहिल्यांदा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 12 सप्टेंबर 1996 ला लोकसभेत मांडलं होतं. मात्र या सरकारचे आधारस्तंभ असलेल्या मुलायम सिंह यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे हे विधेयक पारीत होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर 1997 मध्ये हे विधेयक लोकसभेत पुन्हा आलं. मात्र त्यावेळी शरद यादव यांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं 1998 आणि 1999 अशा दोन्ही वेळेस महिला आरक्षण विधेयक संमत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही हे विधेयक पारीत करणे शक्य झालं नव्हतं. त्यानंतर 2003 मध्ये एनडीए सरकारनं हे विधेयक मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर 2010 मध्ये महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत पारीत झालं. परंतु त्यानंतर लोकसभेत त्याला संमत करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं नाही. त्यानंतर 2014 मध्ये लोकसभा विसर्जित झाल्यानंतर हे विधेयकही बासनात गुंडाळलं गेलं. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक नव्यानं मांडण्यात आलं.

हेही वाचा -

१. Kareena Kapoor birthday : करिष्मा कपूरने दिल्या करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सेलेब्रिशनचे फोटो शेअर

२. Biography of Dr Babasaheb Ambedkar : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट 'जय भीम एका महानायकाची गाथा' झी मराठीवर

३. Nita Ambani hugs SRK : नीता अंबांनीने मारली शाहरुख खानला मिठी, अँटिलियातील गणेश उत्सवात सेलेब्रिटींची मांदियाळी

Last Updated :Sep 21, 2023, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.