ETV Bharat / entertainment

सलमान खानचा भाऊ अरबाज खान पुन्हा एकदा करणार लग्न, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल' ?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 2:43 PM IST

Arbaaz Khan Marriage : अभिनेता सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आता तो कोणाशी लग्न करणार हे जाणून घ्या.

Arbaaz Khan Marriage
अरबाज खान लग्न

मुंबई - Arbaaz Khan Marriage : अभिनेता सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानची लव्ह लाईफ त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहे. मलायकासोबत लग्न तुटल्यानंतर त्यानं जॉर्जिया एंड्रियानीला डेट करणं सुरू केलं होतं. यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. सध्या सलमान खानचे दोन धाकटे भाऊ अरबाज खान आणि सुहेल खान घटस्फोटित जीवन जगत आहेत. आता खान कुटुंबात पुन्हा एकदा एका महिलेचा प्रवेश होणार आहे. अरबाज खान लग्न करत असल्याचं आता समजत आहे. अरबाज खानच्या आयुष्यात आणखी एका मिस्ट्री गर्लचा प्रवेश झाला आहे.

लग्नाची तारीख निश्चित? : अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे आणि ती दुसरी कोणी नसून मेकअप आर्टिस्ट शौरा खान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खान त्याची कथित गर्लफ्रेंड शौरा खानसोबत 24 डिसेंबरला लग्न करणार आहे. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य, खास नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. दरम्यान एका मुलाखतीत जॉर्जियानं सांगितलं होत की, ''मी मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला अनेकदा भेटले आहे. अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताही विचार नाही. लॉकडाउन संपल्यानंतर आमच्या नात्यात बदल झाला आहे. अरबाज खान आणि जॉर्जियाला एकत्र डेट करून 4 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. याशिवाय दोघांच्या वयात सुमारे 20 वर्षांचा फरक आहे.

अरबाज शौराला कुठे भेटला? : अरबाज खान सध्या अभिनेत्री रवीना टंडनसोबतच्या 'पटना शुक्ला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची मेकअप आर्टिस्ट शौरा खान आहे. 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर अरबाज खान आणि शौरा खान यांची भेट झाली असल्याचं म्हटलं जात आहे. हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असून लग्न करणार आहेत. मात्र, या कथित जोडप्याकडून या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शौरा खाननं अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये बड्या स्टार्सचं मेकअप केलं आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान आणि राजकुमार हिराणीच्या पहिल्या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
  2. 'डंकी' रिलीजनंतर चाहत्यांनी केला जल्लोष ; शाहरुख खाननं मानलं आभार
  3. हृदयविकाराचा झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.