ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले एकत्र...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 5:17 PM IST

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लग्नानंतर सोमवारी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे एकत्र दिसले. या कपलला पाहण्यासाठी अनेकजणांनी गर्दी केली होती.

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचं लग्न

मुंबई - Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे कपल 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध झाले. या जोडप्यानं काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत. हे फोटो खूप सुंदर आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान आता उदयपूरमध्ये त्यांच्या भव्य लग्नानंतर ते जयपूरमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. हे कपल बोटीतून खाली उतरून चालत असताना त्यांनी स्मितहास्य देऊन पापाराझींचे स्वागत केले. यावेळी परिणीतीनं गुलाब टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केला होता. यावर तिनं लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासह सुंदर अशी मांग भरली होती. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले होते. यावर तिनं खूप कमी मेकअप केला होता.

विमानतळावर झाले रवाना : दुसरीकडे, राघव चड्ढा यांनी पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केली होती. तसेच या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्यांनी काळ्या रंगाचा गॉगल घातला होता. रागनिती एकत्र खूप खास दिसत होते. त्यानंतर दुपारी 2.30 च्या सुमारास राघव चढ्ढा हे परिणीतीसह उदयपूरच्या महाराणा प्रताप विमानतळावर पोहोचले, यावेळी विमानतळावर लोकांनी खूप गर्दी केली होती. या कपलनी उभ्या असलेल्या लोकांचे अभिवादन स्वीकारले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सोमवारी दिल्लीला रवाना झाले. यानंतर दोघेही दिल्लीतील विमातळावर स्पॉट झाले, इथे देखील अनेकांनी गर्दी केली होती.

परिणीती आणि राघव यांना सोशल मीडियावर अनेकजण देत आहेत शुभेच्छा : उदयपूर येथील हॉटेल ताज लेक पॅलेस आणि हॉटेल लीला पॅलेसमध्ये राघव आणि परिणीतीच्या लग्नाच्या विविध विधींचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, सानिया मिर्झा, हरभजन सिंग यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती आले होते. दरम्यान आता या जोडप्याला प्रियांका चोप्रानं देखील कमेंट करून आशीर्वाद दिला आहे. कमेंट करत प्रियांकानं लिहलं, 'माझे आशीर्वाद नेहमीच' अशी तिनं प्रतिक्रिया देत काही इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच या कपलला मनीष मल्होत्रानेही हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Tiger 3: सलमान खान-कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3'चे प्रमोशनल कॅम्पेन होईल सुरू...
  2. SP Balasubrahmanyam Memorial Day: एसपी बालसुब्रह्मण्यम यांनी केवळ 12 तासात गायली होती 21 गाणी, असा रचला होता विक्रम
  3. Priyanka Chopra's mom Madhu Chopra : रागनितीचं लग्न चुकवण्यामागचं कारण आलं समोर ; प्रियांका चोप्राच्या आईनं केला खुलासा...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.