ETV Bharat / entertainment

Movie Promotion :अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान जयपूरच्या रस्त्यावर फिरताना

author img

By

Published : May 23, 2023, 12:47 PM IST

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सोमवारी जयपूरच्या रस्त्यावर फिरताना दिसले. दोघेही त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजस्थानला गेले आहेत.

Vicky Kaushal and Actress Sara Ali Khan
विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान ज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान दोन दिवस राजस्थानमध्ये आहेत. आज दोघे जयपूरच्या रस्त्यावर फिरताना दिसले. यादरम्यान दोघेही राजस्थानमधील हवामहलमध्ये गेले होते. या दोन्ही स्टार्सना पाहण्यासाठी हवा महलसमोर फार गर्दी झाली होती. यादरम्यान दोघांसोबत असलेल्या टीमने हवा महलला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांला दोघांपासून दूर ठेवले.

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे प्रमोशन : सारा अली खान आणि विकी कौशल यांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या जयपूर भेटीचा ब्लॉग शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही कलाकार हवा महलला भेट दिल्यानंतर तेथे शॉपिंग करताना दिसले. सर्व प्रथम ते लहरिया दुपट्टा विकत घेण्यासाठी गेले. जिथे साराने दुपट्ट्यांची खासियत सांगितली. गोटापट्टीच्या कामाबद्दल सांगितले. यादरम्यान विकीने डोके स्कार्फने झाकले. त्यानंतर साराने स्वतःसाठी जयपुरी शूज खरेदी केला. सध्याला दोघेंही 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. विकी आणि सारा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शहरात जाणार आहेत. सोमवारी दोघेही प्रथम जयपूर शहरातील आयकॉनिक सिनेमा हॉल राजमंदिर येथे पोहोचले. चित्रपटातील 'तेरे वास्ते' हे गाणे जयपूरवासियांमध्ये रिलीज करण्यात आले. या गाण्यावर विकी आणि साराने रोमँटिक नृत्य सादर केले. दोघांना नाचताना पाहून सर्वजण टाळ्या वाजवत राहिले.

विकी आणि साराने केले परफॉर्म : त्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीनुसार हे गाणे पुन्हा वाजवण्यात आले. येथे विकीने शेकडोंच्या संख्येने बसलेल्या प्रेक्षकांना गाण्याच्या स्टेप्स शिकवल्या आणि सर्वांना नाचायला लावले. विकी आणि सारासोबत परफॉर्म करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. विकीने या गाण्याची कोरिओग्राफी स्टेप बाय स्टेप आणि लाइव्ह परफॉर्मन्स सर्वांना समजावून सांगितले. सारा अली खान आणि विकी कौशल यांनी अरिजित सिंगच्या 'फिर और क्या चाहिये' या गाण्यातून त्यांच्या केमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना दाखवली. त्यावेळी त्याने आमचा चित्रपट हा 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे आणि आपण सर्वांनी सांगितले. तसेच रविवारी सारा आणि विक्कीने मोहनलाल माळी यांच्या 170 लोकांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर गावात या कुटुंबातील महिलांसोबत दोघेही स्वयंपाकघरात चुलीवर पोळी भाजत. पोळी आणि भिंडीची भाजी खाल्ली. त्यानंतर दोघेही राजस्थानी गाण्यांवर जोरदार नाचले होते. या चित्रपटात सारा अली खान, विक्की कौशल प्रमुख भूमिकेत असणार आहे. शिवाय राकेश बेदी, अनुभा फतेहपुरिया, नीरज सूद, शारीब हाश्मी आणि इनामूल हक यांच्याही हे देखील या चित्रपटात असणार आहे. या चित्रपटाची कथा कपिल आणि सौम्या (विकी आणि सारा) यांच्या लग्नाभोवती फिरत असते.

हेही वाचा : Actor Aditya Singh Rajput Dead : अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू; ड्रगच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.