ETV Bharat / entertainment

The Kerala Story in Kochi : कोचीमध्ये 'द केरळ स्टोरी'चे शो रद्द, फक्त एकाच चित्रपटगृहात सिनेमा रिलीज

author img

By

Published : May 5, 2023, 3:32 PM IST

कोचीमध्ये 'द केरळ स्टोरी'चे शो रद्द
कोचीमध्ये 'द केरळ स्टोरी'चे शो रद्द

'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाचे केरळमध्ये अनेक थिएटर्समधील प्रदर्शन रद्द झाले आहे. राज्यात हा सिनेमा ५० ठिकाणी रिलीज होणार होता, मात्र अखेरीस केवळ १७ थिएटर्सनी परवानगी दिली होती. आज किती थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज झाला हे अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे.

कोची (केरळ) - कोची शहरातील दोन थिएटर्सनी होणाऱ्या 'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाचे रिलीज नाकारले आहे. शो रद्द केले असले तरी थिएटर मॅनेजमेंटने याबाबतचे कोणतेही कारण दिलेले नाही. कोची शहरातील शेनॉयस या एकाच थिएटरमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे शो सकाळी १० वाजल्यापासून सुरू आहेत.

केरळमधील थिएटर्सची सिनेमा दाखण्यास असमर्थता - केरळमधील ५० थिएटरमध्ये चित्रपट दाखवण्याचे वितरकांनी ठरवले होते. मात्र चित्रपटाबद्दल सुरू झालेल्या वादामुळे थिएटर्स मालकांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. अखेरीस केवळ १७ थिएटर्समध्येच द केरळ स्टोरी रिलीज करण्याचे ठरले होते. परंतु आज घडीला नेहमक्या किती ठिकाणी प्रदर्शन सुरू झाले आहे याची अद्याप माहिती नाही. एर्नाकुलम जिल्ह्यात फक्त तीन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोचीमध्ये शेनॉय, करियाडमधील कार्निव्हल आणि पिरावोममधील दर्शना सिनेमा कॉम्प्लेक्समध्ये 'द केरळ स्टोरी' रिलीज झाला आहे.

द केरळ स्टोरी नवा राजकीय विषय - इस्लाम धर्मपरिवर्तनाची कथित कथानक यात असून याला विरोध होत असल्याने चित्रपटाचे शो रद्द केले जात आहेत. सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित या सिनेमाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि चित्रपटाला विरोधही केला आहे. यामुळे द केरळ स्टोरी हा चित्रपट एक नवा राजकीय विषय बनला आहे.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे निवेदन - केरळ राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, हा चित्रपट जाणीवपूर्वक जातीय ध्रुवीकरणाच्या हेतुने आणि केरळविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने बनवला गेला आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, 'द केरळ स्टोरी या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर, जो मुद्दाम सांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या उद्देशाने आणि केरळ विरुद्ध द्वेषपूर्ण प्रचार पसरवण्याच्या उद्देशाने बनवला गेला आहे असे दिसते. ट्रेलरवरून असे सूचित होते की धर्मनिरपेक्षतेच्या भूमीत, केरळमध्ये स्वतःला धार्मिक अतिरेकी केंद्र म्हणून प्रस्थापित करणाऱ्या संघ परिवाराचा प्रचार करण्याचा हा चित्रपट प्रयत्न करत आहे.' काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी ट्विट केले की, ती तुमची केरळ स्टोरी असू शकते, ती आमची केरळ स्टोरी नाही.

केरळ स्टोरीमधील कथित दावा - 'द केरळ स्टोरी' चित्रपटामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलरमध्ये दावा केला होता की राज्यातील 32,000 मुली बेपत्ता झाल्या आणि नंतर त्या दहशतवादी गट, ISIS मध्ये सामील झाल्या, यानंतर या विषयाच्या वादाला तोंड फुटले.

द केरळ स्टोरी सिनेमाला विरोधी पक्षाचाही विरोध - केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन यांनी नुकतेच 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला प्रदर्शनासाठी परवानगी देऊ नये, असे सांगितले. 'केरळमधील 32,000 महिलांनी धर्मांतर करून इस्लामिक स्टेटचे सदस्य बनल्याचा खोटा दावा करणार्‍या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला स्क्रिनिंगसाठी परवानगी देऊ नये. चित्रपटाला काय म्हणायचे आहे ते ट्रेलरवरून स्पष्टपणे दिसून येते', असे सतीसन यांनी फेसबुकवरील पोस्टमधून सांगितले.

हा चित्रपट संघ परिवाराचा अजेंडा राबविण्याचा आणि अल्पसंख्याक समुदायाबाबत संशयाचे धुके निर्माण करण्याचा प्रयत्न करुन समजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप सतीसन यांनी केला.

हेही वाचा - Salman Khans Kkbkkj : राघव जुयालला 'किसी का भाई...' साठी मिळाले तगडे मानधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.