ETV Bharat / entertainment

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'च्या सेटवर बॉबी आणि सनीची धमाल, होणार अनेक रहस्यांचा उलगडा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 3:17 PM IST

Koffee With Karan 8 : देओल ब्रदर्स सनी आणि बॉबी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या सीझन 8च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. दरम्यान शोचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सनी आणि बॉबीनं वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय 'गदर 2'चं यश पाहून करणनं सनी आणि बॉबीला स्टँडिंग ओव्हेशन दिलं आहे.

Koffee With Karan 8
कॉफी विथ करण सीझन 8

मुंबई - Koffee With Karan 8: करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनंतर देओल ब्रदर्सनं हजेरी लावली आहे. दरम्यान करणच्या शोचा प्रोमो रिलीज करण्यात आला. या प्रोमोमध्ये करण जोहर बॉबी देओल आणि सनी देओलसोबत अनेक विषयावर बोलताना दिसत आहे. संवादादरम्यान करण जोहरनं देओल ब्रदर्सच्या यशाबद्दल स्टँडिंग ओव्हेशन दिलं. याशिवाय त्यानं धर्मेंद्रच्या लिप किसवरही प्रश्न विचारला आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. करण जोहरनं सनी देओलसोबत 'गदर'2च्या कलेक्शनबद्दल बोलताना विचारले की, 'गदर 2'च्या कलेक्शनबद्दल तुम्ही कसे म्हणालात की हे आमचे ऑर्गेनिक कलेक्शन आहे, मग ते आमचे नाही का? या प्रश्नाचे उत्तर देताना सनी आधी हसतो आणि म्हणतो, 'तसं नाहीये, पण आजकाल सगळे तेच करतात'

'कॉफी विथ करण'मध्ये देओल ब्रदर्स करणार धमाल : या प्रोमोमध्ये तिघेही खूप मस्ती करताना दिसत आहेत. दोन्ही भाऊ करणच्या सर्व प्रश्नांची मजेशीरपणे उत्तरे देत आहेत. बॉबी आणि सनी देओलनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये धर्मेंद्रच्या लिप लॉकवर प्रतिक्रिया देत म्हटलं, 'आम्ही सुद्धा किसबाबत विनोद करत बोलत असतो की, बाबा ज्या प्रकारे किस करत आहेत ते पाहाण्यासारखे आहे. या सीनमध्ये ते खूप छान दिसत आहेत'. त्यानंतर सनी म्हणतो की, 'माझे वडील त्यांना हवे ते करू शकतात आणि काही केल्यावर ते त्यातून दूर जातात' हे सांगून तिघेही हसायला लागतात.

बॉबी देओलनं शेअर केला एक खास किस्सा : प्रोमोमध्ये बॉबी देओल एक मजेशीर किस्सा सांगताना दिसला आहे. बॉबीनं सांगितलं की, 'एक दिवस मी सलमानशी बोलत होतो. तो म्हणाला एकदा माझे करिअर चांगले चालले नव्हते, तेव्हा मी तुझ्या भावाच्या पाठीवर चढले होतो. मग मी त्याला म्हणालो, 'मला तुमच्या पाठीवर चढू द्या'. 'कॉफी विथ करण सीझन 8' हा शो 26 ऑक्टोबरपासून सुरू झाला. हा चॅट शो दर गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होतो.

हेही वाचा :

  1. Katrina On Tiger 3 Character : 'स्त्रीसाठी काहीही अशक्य नसतं हे 'टायगर 3' दर्शवतो', 'झोया'च्या पात्राबद्दल कतरिनाचे उद्गार
  2. Vijay Thalapathy : 'लिओ'च्या यशाचं होणार जंगी सेलेब्रिशन, बॉक्स ऑफिसवर केली 'इतकी' कमाई...
  3. Kali Peeli Taxi : हिंदी चित्रपटसृष्टीतील काळी पिवळी टॅक्सीवर आधारित 'या' चित्रपटांबद्दल जाणून घ्या ; टॉप सहा चित्रपट...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.