ETV Bharat / entertainment

Ram Charan Upasana : राम चरण, उपासना कोनिडेलाच्या 'मेगा प्रिन्सेस'चा जयजयकार करण्यासाठी अपोलो रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

author img

By

Published : Jun 20, 2023, 6:38 PM IST

राम चरण आणि उपासना कोनिडेला यांना सोमवारी सकाळी मुलगी झाली. मुलगी झाल्याची बातमी कळताच आरआरआर स्टारच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.

Ram Charan Upasana
राम चरण आणि उपासना

मुंबई : आरआरआर फेम अभिनेता आणि साऊथ सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांना सोमवारी, 20 जून रोजी पहिले मूल झाले. उपासनाने हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात तिच्या मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 11 वर्षांनंतर रामचरण आणि उपासना आई-बाबा झाले आहेत. उपासनाला सोमवारी रात्री 19 जूनला रुग्णालयात दाखल केल्या गेले होते. आज तिने मंगवारी 20 जून रोजी पहाटे एका गोडस बाळाला जन्म दिला. मेडिकल बुलेटिनद्वारे जेव्हा ही बातमी शेअर करण्यात आली, त्यानंतर ही बातमी झपट्याने सोशल मीडियावर पसरली. या जोडप्याच्या चाहत्यांना ही बातमी कळल्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी यांना शुभेच्छा दिल्या.

राम चरणचे चाहते : राम चरणचे असंख्य चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रुग्णालयाबाहेर जमले आहे. राम चरण आणि उपासना यांनी अद्याप अधिकृत विधान जारी केलेले नाही, दरम्यान , वैद्यकीय अधिकार्‍यांनी पुष्टी केली की आई आणि बाळ दोघेही बरे आहेत. तसेच हैद्राबादमधील अपोलो रुग्णालयाबाहेर अनेक चाहते फुगे आणि केक घेऊन गेटबाहेर उभे आहेत. रुग्णालयाबाहेर मुलगी होण्याचा आनंद चाहते साजरा करत असून याठिकाणचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहते याठिकाणी जयजयकार करताना दिसत आहे. राम चरण आणि उपासनाच्या मुलीवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच आनंद साजरा करताना चाहत्यांनी हॉस्पिटलवर लाल फुग्यांचा थवाही उडविला आहे. तर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये चाहते त्यांना अभिनंदन देत केक कापताना दिसत आहे. चिमुकल्या राजकुमारीच्या आगमनाचा आनंद साजरा करत चाहते एकमेकांना केकही खाऊ घालत आहे.

राम चरण आणि उपासनाचा निर्णय : राम चरण आणि उपासनाचे 2012मध्ये लग्न झाले होते. या जोडप्याने अलीकडेच त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस देखील साजरा केला. कुटुंब सुरू करण्याबद्दल बोलताना, उपासनाने पूर्वी सांगितले होते की, त्यांच्या लग्नात लवकर मूल न होण्याचा निर्णय तिने आणि राम दोघांनी घेतला होता आणि दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आता, त्यांच्या मुलीच्या जन्मासह, या जोडप्याने मेगास्टार आणि राम चरणचे वडील चिरंजीवी यांच्या घरी परत जाण्याचा पर्याय निवडला आहे, कारण या जोडप्याचा असा विचार आहे की, त्याच्या मुलीला आजी-आजोबांचे प्रेम मिळावे यासाठी ते दोघे हे पाऊल उचलत आहे.

हेही वाचा :

  1. Eka Kale Che Mani web series :विनोदी कौटुंबीक वेब सिरीज 'एका काळेचे मणी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज
  2. Tamannaah Bhatia : 'जी करदा' वेब सीरिजच्या टिकेवर दिले तमन्ना भाटियाने उत्तर
  3. ZHZB box office Day 18 : सारा अली खान आणि विक्की कौशल स्टारर चित्रपटाने १८व्या दिवशी कमाईत पाहिली घसरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.