ETV Bharat / entertainment

SPKK Collection Day 15 : 'सत्यप्रेम की कथा'ची बॉक्स ऑफिसवरील पकड ढिल्ली, पाहा १५ व्या दिवसाची कमाई

author img

By

Published : Jul 14, 2023, 12:02 PM IST

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५व्या दिवशी थंडा पडला आहे. या चित्रपटाची १५व्या दिवसाची कमाई जाणून घेण्यासाठी वाचा...

SPKK Collection Day 15
सत्यप्रेम की कथा कलेक्शन दिवस १५

मुंबई: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रेम दिले असून या चित्रपटाला आता दोन आठवडे आणि एक दिवस पूर्ण झाला आहे. हा चित्रपट १४ जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला आता १६वा दिवस सुरू झाला आहे. आता सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस थंड पडत चालला आहे. या चालू आठवड्यात या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. हा चित्रपट दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर खूपच सुस्त झाला असून चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 'सत्यप्रेम की कथा'ने पहिल्याच दिवशी ९ कोटी कमाविले होते. त्यानंतर हा चित्रपट हळूहळू कमाई बॉक्स ऑफिसवर करत आला. या १५ दिवसात चित्रपटाने किती कमाई केली आणि १५व्या दिवसाची कमाई जोडून चित्रपटाचे कलेक्शन किती झाले, जाणून घेऊया.

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची १५ व्या दिवसाची कमाई : कार्तिक आणि कियाराच्या चित्रपटाने रिलीजच्या १५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमी कमाई केली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने १५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त १.३० कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन ७२.७६ कोटी रुपये झाले आहे. १३ जुलै रोजी हिंदी हार्टलँडमध्ये चित्रपटाची व्याप्ती १२.९२ टक्के नोंदवली गेली होती. तसेच या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. निर्मितीच्या बजेटपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे.

'सत्यप्रेम की कथा'बद्दल : समीर विद्वान्स दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन हा सत्तू आणि कियारा कथाच्या भूमिकेत आहे. सत्तू हा बेरोजगार मुलगा असून घरोघरी झाडू मारणे, भांडी धुणे, भाजीपाला आणण्याची काम करत असतो, सत्तू ज्या वस्तीतील राहतो त्या वस्तीत एकापाठोपाठ पोरांची लग्न होत असतात. त्याची देखील लग्न करण्याची इच्छा होते. त्यानंतर तो कथाला भेटतो त्यांचे कसे तरी लग्न होते. पण कथाच्या मनात एक गोष्ट दडलेली असते. जे प्रत्येकाच्या आयुष्य कठीण करू शकणारी असते. हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा...

हेही वाचा :

Alia bhatt : पापराझीची हरवलेली चप्पल आलिया भट्टने उचलली, सोशल मीडियावर झाली ट्रोल

Samantha wrap Citadel :सामंथाने पूर्ण केली निर्मात्यांना दिलेली वचनं, उपचारांपूर्वी संपवली सर्व शुटिंग्स

EXCLUSIVE : कियारा अडवाणी शाहरुख खानच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट जवानमध्ये दिसणार 'या' भूमिकेत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.