ETV Bharat / entertainment

Tiger 3 Song Ruaan Out: 'टायगर 3'मधील 'रुआन' गाणं प्रदर्शित, पाहा रोमँटिक लिरीकल व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 10:33 AM IST

Updated : Nov 7, 2023, 11:31 AM IST

Tiger 3 Song Ruaan Out: 'टायगर 3'चं दुसरं गाणे आता रिलीज झालं आहे. चित्रपटाच्या नवीन ट्रॅकचे नाव 'रुआन' आहे. हा ट्रॅक अरिजित सिंगने गायला आहे.

Tiger 3 Song Ruaan Out
टायगर 3 गाणे रुआन आउट

मुंबई - Tiger 3 Song Ruaan Out: सलमान खानच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर 3'बद्दल सध्या चर्चा सुरू आहे. भाईजानचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'रुआन' हे रोमँटिक गाणं रिलीज केलंय. 'रुआन' गाण्याला आवाज अरिजित सिंगनं दिलाय. या गाण्याचा फक्त लिरिकल व्हिडिओ रिलीज झालाय. सलमान खान आणि कतरिना कैफ या दोघांनीही हे गाणे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट पेजवर शेअर केलंय. चित्रपटामधील या मोशन व्हिडिओमध्ये टायगर झोया एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसतायत. इर्शाद कामिलनं लिहिलेल्या गाण्याचं संगीत दिग्दर्शन प्रीतमनं केलंय.

'टायगर 3'मधील दुसरं गाणं प्रदर्शित : सलमान खाननं त्याच्या आगामी चित्रपटातील 'रुआन' गाण्याची क्लिप त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितलं आहे की, हा एक लिरिकल व्हिडिओ आहे. कतरिनानं हे गाणं शेअर करताना 'सोलफुल मेलडी' असं लिहिलंय. व्हिडिओच्या एका पोझमध्ये कतरिना कैफ खुर्चीवर बसलेली दिसतेय. याशिवाय सलमान तिच्या मागे उभा दिसत आहे. तर दुसऱ्या पोझमध्ये भाईजान कॅटच्या कपाळावर प्रेमानं किस घेताना दिसतोय. सध्या भाईजानचे चाहते या गाण्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसताहेत.

'टायगर 3'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग : हा चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होतो. या चित्रपटाची 5 नोव्हेंबरपासून आगाऊ बुकिंग सुरू झालीय. याशिवाय तिकीट खिडकीवर चित्रपटाच्या तिकीटांची विक्री केली जातोय. सॅकनिल्कनुसार, 'टायगर 3' चित्रपटानं आधीच आगाऊ बुकिंगमध्ये 4.2 कोटी रुपये कमावलेत. या चित्रपटाचे आतापर्यत 140000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. 'टायगर 3'मध्ये सलमान आणि कॅट व्यतिरिक्त इमरान हाश्मी, रिद्धी डोगरा, आशुतोष राणा, रेवती मेनन, रणवीर शौरी, अनुप्रिया गोएंका आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'टायगर 3' मध्ये दिसेल शाहरुख खान : 'टायगर 3'मध्ये शाहरुख खान कॅमिओ करताना दिसणार आहे. यापूर्वी सलमान खाननं 'पठाण' चित्रपटामध्ये कॅमिओ केला होता. हा कॅमिओ चाहत्यांना खूप आवडला होता. टायगर आणि झोयाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. या चित्रपटात शाहरुख खानच्या कॅमिओचीही चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Rashmika Mandanna : मॉर्फ व्हिडिओवर रश्मिका म्हणाली, तंत्रज्ञानाचा गैरवापर भयानक
  2. Trailer Date Out : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'चा ट्रेलर होणार 'या' तारखेला रिलीज
  3. KH 234: कमल हसन आणि दुलकर सलमानचं 'केएच 234' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज
Last Updated : Nov 7, 2023, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.