ETV Bharat / entertainment

बॉक्स ऑफिसवर 'सालार'ची त्सुनामी : 'पठाण', 'जवान', 'अ‍ॅनिमल'चे मोडले अ‍ॅडव्हान्स बुकिंग रेकॉर्ड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 1:14 PM IST

Salar Advance Booking Record
बॉक्स ऑफिसवर 'सालार'ची त्सुनामी

Salar Advance Booking Record : प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाने 2023 या वर्षातील पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये आधी रिलीज झालेल्या सर्व ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम निर्माण करु शकतो असा अंदाज बांधला जात आहे.

मुंबई - Salar Advance Booking Record : इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार 'सालार'च्या पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनने शाहरुख खान स्टारर 'जवान' आणि पठाण, रणबीर कपूर स्टारर अलीकडील हिट चित्रपट 'अ‍ॅनिमल' आणि विजय स्टारर 'लिओ' या चित्रपटांना मागे टाकलंय.

  • Highest Opening Day Advance Booking Gross For 2023 in India💥💥

    1. #Salaar: 48.94 Cr
    2. #LEO: 46.36 Cr
    3. #Jawan: 40.75 Cr
    4. #Animal: 33.97 Cr
    5. #Pathaan: 32.01 Cr

    — Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाला 'डंकी'च्या शर्यतीत योग्य प्रमाणात स्क्रीन वाटप नुळाले नसल्याच्या चर्चा असूनही, 'सालार' निःसंशयपणे या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर एक उत्तम ओपनिंगसाठी सज्ज आहे. सॅकनिल्क वरील अहवालात म्हटले आहे की, चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 48.94 कोटी रुपयांची कमाई केली. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे सूचित करतात की 'सालार' चित्रपटाने 2023 च्या प्रमुख हिट चित्रपटांना मागे टाकले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

उदाहरणार्थ, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स विक्रीच्या पहिल्या दिवशी ३२.०१ कोटी रुपयांची कमाई करून विक्रम केला होता. 'जवान'ने ही रक्कम ओलांडली आणि अ‍ॅडव्हान्स तिकिटांमध्ये तब्बल 40.75 कोटी रुपयांची कमाई केली. रणबीर कपूरच्या सर्वात अलीकडील चित्रपट, 'अ‍ॅनिमल'ने बॉक्स ऑफिसवर 33.97 कोटी रुपयांच्या अ‍ॅडव्हान्स विक्रीसह ऐतिहासिक सुरुवात केली, तर विजयच्या बहुप्रतिक्षित 'लिओ' चित्रपटाने मोठ्या यशासाठी प्रीमियर केला आणि दिवसभरासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 46.36 कोटी रुपयांची कमाई केली होती.

  • #Salaar Hyderabad City Advance: 💥💥

    12.11 Cr [1120 shows]☑️

    All time highest in our record but At the time of #RRR, tracking was less.

    — Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'सालार' आधीच उत्तर अमेरिकेतील 2023 मधील टॉप टेन भारतीय ओपनिंग चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाने यूएसए आणि कॅनडात जवळपास 1.51 दशलक्ष डॉलर्स प्री-सेल कलेक्शनसह शाहरुख खानच्या 'पठाण'ला मागे टाकले आहे. सॅकनिल्कने वर्तवलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार प्रभास स्टारर 'सालार'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचण्याची शक्यता आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवेल आणि यशाची नवी शिखरं सर करेल अशी अपेक्षा आहे.

तेलंगणासारख्या राज्यांनी प्रेक्षकांची मागणी पूर्ण करण्यासाठी चित्रपटाच्या टीमला सकाळी 1 आणि सकाळी 6 चे शो करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळे चित्रपटाभोवती उत्साह वाढल्याचं चित्र आहे. प्रभास व्यतिरिक्त या चित्रपटात श्रृती हासन नायिकेच्या भूमिकेत आहे, तर पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत दिसत आहे.

हेही वाचा -

  1. 'सालार' नेत्रदीपक ओपनिंगसाठी सज्ज, 100 कोटींपेक्षा जास्त कमाईची शक्यता
  2. 'सालार'ची धुमधडाक्यात सुरुवात, प्रशांत नीलच्या अ‍ॅक्शनरचे प्रेक्षकांकडून कौतुक
  3. शाहरुख खान स्टारर 'पठाण' आणि 'जवान'चे ओपनिंग डे रेकॉर्ड तोडण्यात 'डंकी' अपयेशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.