ETV Bharat / entertainment

शाहरुखच्या 'डंकी'शी टक्कर घेण्यासाठी प्रभासचा 'सालार' सज्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 2:38 PM IST

Salaar Advance Booking: साऊथ अभिनेता प्रभास त्याच्या आगामी 'सालार' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. शाहरुख खानच्या 'डंकी'ला टक्कर देण्यासाठी, हा चित्रपट 22 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे.

Salaar Advance Booking
सालार अ‍ॅडव्हान्स बुकिंग

मुंबई - saalar Movie : साऊथ अभिनेता प्रभास स्टारर 'सालार' सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'सॅकनिल'च्या रिपोर्टनुसार तेलुगू आवृत्तीमध्ये या चित्रपटाची 11 लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. 'सालार' चित्रपटाची आतापर्यत एकूण 1471474 तिकिट विकली गेली आहे. या चित्रपटानं रिलीजपूर्वी 30.96 कोटीची कमाई केली आहे. प्रभासचे चाहते 'सालार'ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.

'सालार'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग : 'सालार' चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केलं आहे. हा चित्रपट 400 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. या चित्रपटाला रवी बसरूर यांनी संगीत दिलंय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. तेलुगू आवृत्ती व्यतिरिक्त या चित्रपटानं मल्याळममध्ये 110330 तिकिट विकली आहेत. तमिळ - 76752 तिकिट, कन्नड - 16885 तिकिट, हिंदीत - 106271 तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय तेलुगू आयनॉक्समध्ये - 3540 तिकिट आणि हिंदीत 237 तिकिट विकली गेली आहेत. दरम्यान शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'सालार' चित्रपटाबद्दल : 'सालार' या चित्रपटामध्ये प्रभास व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, सरन शक्ती, जगपती बाबू, टिन्नू आनंद, श्रेय भार्गव आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'सालार'मध्ये प्रभास हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसेल. प्रभासला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण याआधी त्याचा 'आदिपुरुष' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळं याची खूप कमी कमाई झाली होती. अनेकजणांनी या चित्रपटावर बंदी यावी याची मागणी केली होती. हा चित्रपट 500 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला होता. या चित्रपटानं एकूण 354 कोटीची कमाई केली होती.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान आणि राजकुमार हिराणीच्या पहिल्या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
  2. 'डंकी' रिलीजनंतर चाहत्यांनी केला जल्लोष ; शाहरुख खाननं मानलं आभार
  3. हृदयविकाराचा झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.