ETV Bharat / entertainment

'कबीर सिंग'साठी रणवीर सिंगनं दिला होता नकार; संदीप रेड्डी वंगानं केला खुलासा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 4:50 PM IST

Sandeep Reddy Vanga :दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटच्या प्रमोशनदरम्यान संदीप यांनी 'कबीर सिंग' चित्रपटाबाबत खुलासा केला आहे.

Sandeep Reddy Vanga
संदीप रेड्डी वंगा

मुंबई - Sandeep Reddy Vanga: दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा त्यांच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळं चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. आता 'अनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यादरम्यान त्यानी त्याच्या याआधीच्या हिट चित्रपट 'कबीर सिंग'बद्दल मोठा खुलासा केला आहे.

रणवीर सिंगनं 'कबीर सिंग' चित्रपट नाकारला : एका मुलाखतीत त्यांनी आपल्या चित्रपटांचे पुन्हा कधीही रिमेक बनवणार नसल्याचं म्हटलं होतं. यामागील कारण सांगताना त्यांनी म्हटलं होतं की, 'अर्जुन रेड्डी' या त्याच्या तेलुगू हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. 'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद कपूरला कास्ट करायचं नसल्याचं संदीपनं यावेळी सांगितलं आणि कबीर सिंगसाठी त्याची पहिली पसंती रणवीर सिंग होता असंही त्यांनी म्हटलं होत. पुढं त्यानं म्हटलं, रणवीरनं या भूमिकेमुळं आपली प्रतिमा डागाळणार असल्याचं सांगत ही ऑफर नाकारली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'कबीर सिंग'मध्ये शाहिद कपूरची एंट्री : यानंतर संदीप यांच्या मनात शाहीद कपूरचा विचार आला आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी निर्मात्याला याबद्दल सांगितले. यावेळी चित्रपटाच्या निर्मात्यानं म्हटलं होतं की, शाहिद कपूरचे मार्केट चांगले नाही आणि त्यांना बॉक्स ऑफिसवर जास्त पैसे मिळणार नाहीत. रणवीर सिंगचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट चांगला असल्याचं सांगण्यात आले होते. शाहिदबद्दल असं म्हटलं जातं होत, की त्याचा एकही चित्रपट 100 कोटीचा व्यवसाय करू शकला नाही. यावेळी जेव्हा शाहिदला ही भूमिका मिळाली, तेव्हा त्यानं ती आनंदानं केली आणि 'कबीर सिंग' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 280 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटामधील गाणे देखील अनेकजणांना पसंत पडली होती.

हेही वाचा :

  1. सलमान खानऐवजी करण जोहर होस्ट करणार 'बिग बॉस 17' चा वीकेंड का वार?
  2. हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' रिलीज होईल 'या' दिवशी
  3. चित्रपट फ्लॉपची जबाबदारी माझी तर हिटचं श्रेय टीमला जातं : सलमान खान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.