ETV Bharat / entertainment

Rani Mukherjee is upset : ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटाला ओटीटी कंटेंट म्हणणाऱ्यांवर राणी मुखर्जी नाराज

author img

By

Published : Mar 29, 2023, 1:03 PM IST

अभिनेत्री राणी मुखर्जीचा बहुचर्चित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आणि त्याचे सर्वत्र कौतुकही झाले. मात्र काही लोकांनी सिनेमा न पाहाताच हा ओटीटी कंटेंट असल्याचे म्हटले. यामुळे राणी मुखर्जी नाराज झाली आहे.

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे
मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे

मुंबई - हिंदी सिनेसृष्टील गुणी अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट अलिकडे प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगले कौतुक कले. चित्रपटाचा वेगळा विषय आणि आशय सामान्य प्रेक्षकांना भावला. यात राणीने साकारलेली मुलांसाठी सरकारच्या विरोधात बंड करुन लढणारी आई सर्वांना आवडली. असे असले तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अपेक्षित कमाई केली नाही. दहाव्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे. काही प्रेक्षकांनी हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतीक्षा केली असल्याचे दिसते. याबद्दल राणी मुखर्जीने नाराजी व्यक्त केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा कल वाढला - गेल्या तीन वर्षामध्ये ओटीटीवर मनोरंजन करण्याची पद्धत वाढली आहे. कोविडच्या काळात व त्यानंतर अनेक महिने थिएटर्स बंद होती. त्यावेळी लोकांनी ओटीटीचा मार्ग अनुसरला. त्याचा फटका जगभरातील चित्रपट व्यवसायाला झाला आहे. त्यानंतर अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता थेट ओटीटीवर दाखवण्याचा पायंडाही काही निर्मात्यांनी पाडला. पण चांगला चित्रपट असेल तर लोक थिएटरमध्ये जातातच हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवले. पुष्पा, केजीएफ, विक्रम, पोन्नीयन सेल्वन, कंतारा, दृष्यम २ आणि अलिकडेच रिलीज झालेला पठाण या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणले.

राणी मुखर्जीची नाराजी - ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या उत्तम कथानक असलेल्या चित्रपटाला लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजे अशीच राणी मुखर्जीची इच्छा होती. काही लोकांनी या चित्रपटाला ओटीटी कंटेंट असलेला चित्रपट असल्याचे म्हटले होते. हे राणीला न पटणारे होते. यासाठी तिने तिच्या पातळीवर संघर्ष केला. पण दुसऱ्या बाजूला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपट थिएटरमध्ये पाहणाऱ्यांनी त्याचे तोंडभरुन कौतुक केले याचे समाधानही राणीला वाटले. हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी देशभर रिलीज झाला. अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही यात महत्तवाच्या भूमिका आहेत. सत्यकथेवर आधारित असलेल्या या कथानकाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.

हेही वाचा - Parineeti Chopra Blushes : लग्नाच्या बातमीबद्दल विचारताच लाजून गोरीमोरी झाली परिणीती चोप्रा पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.