ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor physical transformation : अ‍ॅनिमलसाठी रणबीर कपूरचे मजबूत शारीरिक परिवर्तन, फोटो व्हायरल

author img

By

Published : Jun 30, 2023, 3:44 PM IST

ब्रह्मास्त्र आणि तू झुठी मैं मक्कार या चित्रपटांनंतर आता रणबीर कपूर अ‍ॅनिमल या चित्रपटातून धमाकेदार भूमिका करण्यासाठी येत आहे. या चित्रपटातच्या सेटवरील फोटो व्हायरल होत असून आता रणबीरचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे.

Ranbir Kapoor physical transformation
रणबीर कपूरचे मजबूत शारीरिक परिवर्तन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच त्याच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट अ‍ॅनिमलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून आता फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रतीक्षा सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून पुन्हा पुन्हा काही फोटो समोर येत आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगला बराच काळ झाला असला तरी या चित्रपटातील रणबीर कपूरच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आदल्या दिवशीही रणबीरचा एक फोटो व्हायरल झाला होता आणि पुन्हा एकदा रणबीरचा नवा फोटो समोर आला आहे. आता रणबीर कपूरचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यात अभिनेत्याची मजबूत स्नायूसह शरीरसौष्टव पाहायला मिळत आहेत.

जिम ट्रेनर शिवमसोबत रणबीर कपूरचा फोटो - या फोटोमध्ये रणबीर कपूर जिम ट्रेनर शिवमसोबत दिसत आहे. शिवमने रणबीरसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूरची मजबूत बॉडी नजरेत भरताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत शिवमने लिहिले आहे, 'तू झुठी मैं मक्कार की बीच बॉडी से एनिमल लिए बीस्ट बॉडी'. विशेष म्हणजे शिवमने तू झुठी मैं मक्कारसाठीही रणबीरची बॉडी तयार केली होती. अ‍ॅनिमल चित्रपटात रणबीरला देखणा आणि मजबूत दिसण्यासाठी शिवमने पुन्हा एकदा त्याच्या शरीरावर खूप मेहनत घेतली आहे. शिवमबद्दल सांगायच झाले तर, तो अमिताभ बच्चन आणि जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटींसाठी फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आला आहे.

अ‍ॅनिमल या चित्रपटाबद्दल - अ‍ॅनिमलबद्दल बोलायचे झाले तर, दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या यशस्वी दिग्दर्शकाने अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. या चित्रपटात रणबीरशिवाय साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटासोबत गदर-2 आणि ओह माय गॉड 2ही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या महत्त्वाच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर अपरिहार्यपणे टक्कर होणार आहे.

हेही वाचा -

१. Ranbir Alia Return Mumbai : दुबईच्या सुट्टीवरून मुंबईला परतले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, पहा त्यांची झलक

२. Adipurush Box Office Collection : आदिपुरुष या चित्रपटाची कमाई धोक्यात

३. Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज 2 स्टार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी शेअर केला त्यांच्या डेटिंग अनुभवाबद्दलचाा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.