ETV Bharat / entertainment

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 2:14 PM IST

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding Date : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे लग्नबंधनात लवकरच अडकणार आहेत. त्याचं लग्न गोव्यात होत असल्याचं समजतंय.

Rakul Preet Jacky Bhagnani Wedding Date
रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची डेट

मुंबई - Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding Date : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी सध्या चर्चेत आहेत. रकुल आणि जॅकी लग्न करणार असल्याचं समजतंय. हे कपल 2021 पासून एकमेकांना डेट करतायत. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांची लव्ह लाईफ ही कोणापासून लपलेली नाही. दोघे अनेकदा एकत्र दिसतात. रकुल प्रीत आणि जॅकी यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून पुढील महिन्यात ते गोव्यात 22 फेब्रुवारी 2024 रोजी लग्न करणार आहेत. सध्या रकुल आणि जॅकी भगनानी बँकॉकमध्ये एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत.

जॅकी भगनानी आणि रकुल प्रीतचं लग्न : गोव्यात पुढच्या महिन्यात अत्यंत साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा होणार आहे. रकुल प्रीत सिंगनं तिच्या वाढदिवसानिमित्त जॅकी भगनानीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. रकुलनं जॅकीला तिची सर्वोत्कृष्ट आणि खास भेट असल्याचं या पोस्टद्वारे म्हटलं होत. रकुल आणि जॅकी यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. जॅकी भगनानीचे वडील वासू भगनानी या लग्नाच्या स्वागत सोहळ्याला भव्यदिव्य बनवण्याच्या तयारीत आहेत. मात्र या जोडप्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचं वर्क फ्रंट : रकुलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती कमल हसनसोबत 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा प्रीक्वल 1996 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये कमल हसन यांनी एका वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली होती. दुसरीकडे जॅकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय, टायगर, सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. रिलीजच्या दहाव्या दिवशीही 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर चलती, केली 'इतकी' कमाई
  2. 'महाभारत' फेम शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरनं गोंडस मुलीला दिला जन्म
  3. शाहरुख खान स्टारर 'डंकी'नं बॉक्स ऑफिसवर केला धमाका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.