ETV Bharat / entertainment

'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं किंग खानला केलेल्या विचित्र मागणीमुळं झाली ट्रोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 4:29 PM IST

Updated : Nov 23, 2023, 4:39 PM IST

Shah Rukh Khan and Rakhi sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तिनं 'किंग खान'कडे विचित्र मागणी केलीय. त्यामुळं आता तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

Shah Rukh Khan and  Rakhi sawant
शाहरुख खान आणि राखी सावंत

मुंबई - Shah Rukh Khan and Rakhi sawant : बी-टाऊनची ड्रामा क्वीन राखी सावंत सतत चर्चेत राहण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत असते. राखीसाठी प्रसिद्धीझोतात येणे ही मोठी गोष्ट नाही. राखी जेव्हा चर्चेत येते, तेव्हा तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करतात. आता राखीनं केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकजण ती 'मुर्ख' असल्याचं सोशल मीडियावर म्हणत आहेत. राखीनं आता हिंदी चित्रपटसृष्टीचा 'बादशाह' शाहरुख खानबद्दल म्हटलं की, तिला आर्यन खानसारखा मुलगा हवा आहे आणि त्यासाठी तिला शाहरुख खानच्या स्पर्मची गरज आहे.आता राखीच्या विचित्र मागणीमुळं तिला सोशल मीडियावर 'किंग खान'चे चाहते ट्रोल करत आहेत.

राखी सावंतचा व्हिडिओ झाला व्हायरल : राखी सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अशा विचित्र मागण्या करताना दिसत आहे. त्याचवेळी राखीच्या या मागणीने शाहरुखचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. एका मुलाखतीत राखीला विचारण्यात आलं होतं की, असा कोणी स्टार आहे ज्याला तुम्हाला तुमच्या मुलांचा बाप बनवायचा आहे? त्यानंतर ती म्हणते की शाहरुख खान. जर मला त्याचे स्पर्म दिले तर मी सरोगसी करू शकते. त्याची सर्व मुलं खूप गोंडस आहेत, विशेषतः आर्यन खान. आता राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

राखी सावंत झाली ट्रोल : आता या वक्तव्यामुळे राखीला एका यूजरनं म्हटल की, 'राखी मुर्ख आहे तिनं मागणी केली आहे' दुसऱ्या एकानं लिहिलं 'तिचा उत्साह पाहा... ताई तो शाहरुख खान आहे... कमाल आर खान नाही'. आणखी एकानं या पोस्टवर लिहलं, 'राखीला कोणी विचारतही नाही आणि ती अशा मागण्या करत आहे'. राखी सावंतच्या अजब मागणीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. राखी शाहरुख खानच्या 'मैं हू ना' या चित्रपटातही दिसली होती. राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

हेही वाचा :

  1. सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनचा आलिया भट्टच्या कास्टिंगला होता विरोध, करण जोहरचा खुलासा
  2. कपिल देवनं पूर्ण केलं 'लाल सलाम'चं डबिंग, रजनीकांतसोबत शेअर करणार रुपेरी पडदा
  3. अगस्त्य नंदानं कथित गर्लफ्रेंड सुहानाबरोबर कापला वाढदिवसाचा केक, व्हिडिओ व्हायरल
Last Updated : Nov 23, 2023, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.