ETV Bharat / entertainment

पंतप्रधान मोदींनी भाजपचे राज्यसभा खासदार सुरेश गोपीच्या मुलीच्या लग्नाला लावली हजेरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 4:59 PM IST

PM Modi in Wedding: साऊथ अभिनेता आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुरेश गोपी यांची मुलगी भाग्या सुरेशचं आज 17 जानेवारी रोजी लग्न झालं. या लग्नात पंतप्रधान मोदीही उपस्थित होते.

PM Modi in Wedding
लग्नात पंतप्रधान मोदी

मुंबई - PM Modi in Wedding: साऊथ अभिनेता आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुरेश गोपी यांची मुलगी भाग्या सुरेशचं आज 17 जानेवारी रोजी केरळमधील गुरुवायूर येथे लग्न झालं. भाग्याचं लग्न कुटुंब आणि काही खास नातेवाईक तसेच व्हीआयपी पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलं. या लग्नात मल्याळम स्टार्स मामूट्टी, मोहनलाल, जयराम आणि दिलीप यांसारखे दिग्गज कलाकार हजर होते. दरम्यान या लग्नात व्हीआयपी पाहुणे म्हणून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वधू-वरांना यावेळी आशिर्वाद दिला. 17 जानेवारीला अभिनेता सुरेश गोपी यांची मुलगी भाग्याचा विवाह उद्योगपती श्रेयस मोहनसोबत झाला.

राज्यसभा खासदार सुरेश गोपी यांच्या मुलीचा लग्न सोहळा : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स या लग्नात आपापल्या कुटुंबासह आले होते. यावेळी पीएम मोदींनी मोहनलाल, मामूट्टी यांच्यासह सर्व दक्षिणेकडील स्टार्स तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीएम मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पीएम मोदी यांनी गुरुवायूरच्या प्रसिद्ध कृष्ण मंदिराचे दर्शन करून या लग्नाला हजेरी लावली. या प्रसंगात मोदी यांनी केरळ राज्याचा पारंपारिक पोशाख धोती आणि कुर्ता परिधान केला होता. यावर त्यांनी पांढरी शाल घेतली होती. या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी लावली लग्नाला हजेरी : पीएम मोदी 16 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता आंध्र प्रदेशातून कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्याचवेळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी 7.35 वाजता खुल्या जीपमधून रोड शो केला. रोड शो दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन पंतप्रधानांना पाठिंबा देत होते. दरम्यान या लग्नाला पीएम मोदी हजर असल्यामुळे हा विवाह सध्या खूप चर्चेत आहे. भाग्या आणि श्रेयसच्या विवाह हा अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडला.

हेही वाचा :

  1. 'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे
  2. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ स्टारर 'दो और दो प्यार'चं फर्स्ट लूक रिलीज
  3. रिचा चड्ढाने घेतला फ्लाइट विलंबाचा कटू अनुभव, एअरलाइन्समधील मक्तेदारीला दिला दोष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.