ETV Bharat / entertainment

Kiara And Sidharth : 'शेरशाह' चित्रपटातील जोडी पुन्हा दिसणार एकत्र रूपेरी पडद्यावर

author img

By

Published : May 27, 2023, 2:54 PM IST

बी-टाऊनचे सुंदर कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. यशराज कॅम्पचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Kiara And Sidharth
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी

मुंबई : शेरशाहची जोडी आणि बी-टाऊनचे सुंदर कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. हे जोडपे नुकतेच जपानच्या सुट्टीवरून परतले. आता या जोडप्याच्या सुट्टीच्या आगमनानंतर त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदाच लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यशराज कॅम्पचे दिग्दर्शक शशांक खेतान हा चित्रपट बनवणार आहे. तसेच यापुर्वी शशांकने वरुण धवन आणि आलिया भट्टसोबत हंपी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया हे चित्रपट बनवली आहे. तसेच कियारा आणि सिद्धार्थच्या चित्रपटाचे जुलै महिन्यात वर्कशॉप सुरू होणार आहे. शिवाय ऑगस्टमध्ये हा चित्रपट फ्लोरवर येणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. ही सुंदर जोडी या चित्रपटासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे.

सिद्धार्थ आणि कियारा कधी प्रेमात पडले? : कियारा आणि सिद्धार्थची 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या लस्ट स्टोरीजच्या रॅप अप पार्टीमध्ये पहिली भेट झाली होती. किआराने स्वत: कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये शेअर केले, 'आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये बोलायला लागलो होतो, त्यानंतर आम्हाला एकमेकांबद्दल आकर्षण वाटले. आम्ही भेटालो. ती रात्र मी कधीही विसरणार नाही.'असे कियारा यावेळी सांगितले होते. त्यानंतर शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्यानंतर, सिद्धार्थ आणि कियाराच्या लिंक-अपच्या अफवा पसरू लागल्या. काही महिन्यानंतर, दोघे हँग आउट करत होते. त्यानंतर त्यांना प्रेम झाले. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सिड-कियाराने आपले नाते बरेच दिवस गुप्त ठेवले होते.

राजस्थानमध्ये केले लग्न : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले होते. यांनी पहिल्यांदाच 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. 'शेरशाह' हा चित्रपट परमवीर चक्र पुरस्कार विजेते विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय या चित्रपटात त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमासोबतच्या नातेबद्दलही दाखविण्यात आले आहे. तसेच या नवीन चित्रपटाबाबत सिद्धार्थ-कियाराकडून काही प्रतिक्रिया आल्या नाही आहे. मात्र शशांकने एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिले आहेत. त्याने सांगितले की, 'मला कियारासोबतच्या प्रोजेक्टसाठी वेळ हवा आहे, 'मी 2023 पर्यंत व्यस्त आहे, माझ्याकडे 3 प्रोजेक्ट आहेत'. सध्याला कियारा अडवाणी ही तिच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिक आर्यनने या चित्रपटाचे शूटिंग म्हणजेच २६ मे रोजी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा : IIFA 2023 : सलमान खानच्या अंगरक्षकाने धक्काबुक्की केल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.